Canara Bank Bharti 2025|कॅनरा बँकेत 35000 जागांची मेगा भरती सुरू पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र, इथे करा अर्ज |

Canara Bank Bharti 2025 :कॅनरा बँक अंतर्गत नवीन नोकरी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॅनरा बँकेमध्ये 3500 अप्रेंटिस पदाची पदभरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर असणारे उमेदवार पात्र आहेत. कॅनरा बँक मध्ये पदवीधर असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी बँकेने इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


Canara Bank Bharti Details

अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या होणाऱ्या पद भरतीसाठी उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज सादर करणे बंधनकारक राहील. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना आवश्यक असणारे सर्व सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2025 आहे.

Canara Bank Apprentice Recruitment 2025

कॅनरा बँक अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. तूर्तास परीक्षेची तारीख आलेली नाही लवकरच येईल , अर्ज भरलेल्या उमेदवारांना नंतर परीक्षा तारीख कळवली जाईल.

कॅनरा बँक मध्ये होणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये पदाचे नाव, पदांची संख्या, अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, परीक्षा, ऑनलाइन अर्ज कसा करावा त्यांची माहिती खाली दिलेली आहे.

Canara Bank Recruitment 2025

पदाचे नाव (Name of the Posts ) : कॅनरा बँक अंतर्गत अप्रेंटिस या पदाची भरती प्रक्रिया होणार आहे.

एकूण पदे (Total Posts) : कॅनरा बँक मध्ये शिकाऊ उमेदवार 3500 जागांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणारा उमेदवार हा किमान मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून पदवीधर असावा. किंवा शासनाने जारी केलेली समकक्ष पदवी असावी.

वयाची अट (Age Limit) : कॅनरा बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना वयाची मर्यादा पुढीलप्रमाणे – यामध्ये 1 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवारांचे वय वर्ष हे 20 ते 28 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

  • खुला प्रवर्ग : 20 ते 28 वर्षापर्यंत
  • ओबीसी (OBC) : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती जमाती (SC/ST) : 05 वर्षाची सूट.

नोकरी ठिकाण (Job Location) : या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना भारतभर कोणत्याही शाखेत कुठेही पोस्टिंग मिळू शकते.

वेतन (Salary) : अप्रेंटिस पदाच्या प्रशिक्षणाच्या कालावधी दरम्यान उमेदवारांना दरमहा 15000 इतके दिले जाईल.( तसेच भारत सरकारकडून रक्कम समाविष्ट असल्यास मिळेल. ) शिकाऊ उमेदवारांना इतर कोणत्याही ध्येय भत्ते मिळणार नाहीत. शिकाऊ उमेदवारांना दरमहा 15,000 चे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, तसेच भारत सरकारकडून मिळणारे 4500 हे वेतन (DBT) प्रणाली द्वारे उमेदवारांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा (Important Dates ) :

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2025 आहे.
  • परीक्षेची तारीख आल्यानंतर उमेदवारांना कळवण्यात येईल.

निवड प्रक्रिया : कॅनरा बँक अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया ही स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी द्वारे केली जाईल.

महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • पदवी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • अर्ज शुल्क चलन
  • EWS लागू असल्यास
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • फोटो आणि सही

अर्ज शुल्क : या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना पुढील प्रमाणे अर्ज शुल्क आकारलेले आहे –

  • खुला प्रवर्ग / ओबीसी : रु 500
  • एससी/एसटी /पीडब्ल्यूडी : त्यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

Canara Bank Bharti Apply Online

ऑनलाइन अर्ज कसा करावा – कॅनरा बँक मध्ये होणाऱ्या शिकाऊ उमेदवार पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना पुढील प्रमाणे अर्ज सादर करायचा आहे.

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वरती अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. याचे उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी कॅनरा बँकेच्या होम पेज वरती जाऊन आवश्यक असलेला तपशील भरून नोंदणी करावी.
  • विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरावे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जाची पडताळणी करून सबमिट करा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील उशिरा आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2025 आहे.