Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया करण्यासाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे महानगर पालिका अंतर्गत ” कनिष्ठ अभियंता’‘ ( स्थापत्य) या पदाची पद भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाच्या एकूण 169 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळ न करता तात्काळ अर्ज सादर करावा.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Notification
पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारांना 1 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. त्यामुळे अर्जदार उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेळेस वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करावा.
संबंधित उमेदवारांनी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Details
पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या कनिष्ठ अभियंता या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिले आहे.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य)
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता भागाच्या एकूण 169 जागा
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
- उमेदवारांची किमान वय हे 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
- मागासवर्गीय/ अनाथ/ खेळाडू : 43 वर्षापर्यंत असावे.
- दिव्यांग/ दिव्यांग माजी सैनिक/ भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त : 45 वर्षांपर्यंत असावे.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे महानगरपालिका
♦️वेतन (Salary) :
- या भरतीमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना रु. 38,600/- ते रु 1,22,800/- एवढी वेतनश्रेणी दरमहा दिली जाईल.
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात : 1ऑक्टोबर 2025
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 ऑक्टोबर 2025
- ऑनलाइन अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2025
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढील कागदपत्रे असावीत.
- अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत पूर्ण केलेली पदवी प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी (Domicile) प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग / सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 1000/- असे शुल्क आहे.
- मागासवर्गीय प्रवर्ग ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती) या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 900/- इतके फी भरावी लागेल.
- माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन
- Apply Online या पर्यायावर क्लिक करून नवीन नोंदणी करावी.
- लॉगिन करून आवश्यक असलेले सर्व माहिती भरावी.
- फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
- ऑनलाइन फी भरून अर्ज सबमिट करावा.
- अर्ज प्रिंट काढून ठेवावी.