MPSC Group C Bharti 2025! MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क पूर्वपरीक्षा 2025|पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Group C Bharti 2025

MPSC Group C Bharti 2025 :MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या पद भरतीसाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट क संवर्गातील रिक्त असणाऱ्या पदांचे पद भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट का संवर्गासाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयोगाचे संकेतस्थळ उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 27 ऑक्टोबर 2025 ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक राहील. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MPSC Group C Bharti 2025 Notification

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) कडून एकूण 938 जागा रिक्त असून त्या पुढीलप्रमाणे भरायचे आहेत, उद्योग निरीक्षक (Industry Inspector), तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant), कर सहाय्यक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk Typist) या पदांची पद भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून दिलेल्या वेळेमध्ये अर्ज करायचा आहे. तसेच अधिकृत जाहिरात दिलेली आहे ते पहावी.

MPSC Group C Bharti 2025 Details

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

  • उद्योग निरीक्षक (Industry Inspector)
  • तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)
  • कर सहाय्यक (Tax Assistant)
  • लिपिक टंकलेखक (Clerk Typist)

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :पदाचे नाव, विभाग जागांची संख्या पुढील प्रमाणे

पद क्र. पदाचे नाव विभाग जागा
1 उद्योग निरीक्षक (Industry Inspector)उद्योग ऊर्जा व कामगार विभाग / Department of Industry Energy and Labour09
2 तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)वित्त विभाग / Department of Finance04
3 कर सहाय्यक (Tax Assistant)वित्त विभाग / Department of Finance73
4 लिपिक टंकलेखक (Clerk Typist)मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाचे महाराष्ट्रातील विविध कार्यालय / Ministerial Administrative Department as well as various offices of the State Government in Maharashtra852
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

  • पद क्रमांक 1 : सिविल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी असावी.
  • पद क्रमांक 2 : पदवी उत्तीर्ण
  • पद क्रमांक 3 : (i)पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि , व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि .
  • पद क्रमांक 4 : (i)पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि , व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि .

♦️वयाची अट (Age Limit) : पदानुसार पुढील प्रमाणे

  • पद क्रमांक 1 : 19 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 2 : 19 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 3 : 19 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 4 : 19 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय / अनुसूचित जाती-जमाती/ अपंग/ अनाथ या प्रवर्गासाठी वयामध्ये सूट दिलेली आहे.

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र

♦️वेतन (Salary) : पदानुसार पुढीलप्रमाणे

  • पद क्रमांक 1 : S-13 : 35400-112400 अधिक महागाई भत्ता व धियमाप्रमाणे देय भत्ते.
  • पद क्रमांक 2 : S-10 : 29200-92300 अधिक महागाई भत्ता व धियमाप्रमाणे देय इतर भत्ते
  • पद क्रमांक 3 : S-8 : 25500-81100अधिक महागाई भत्ता व धियमाप्रमाणे देय इतर भत्ते
  • पद क्रमांक 4 : S-6 : 19900-63200अधिक महागाई भत्ता व धियमाप्रमाणे देय इतर भत्ते

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2025
  • पूर्वपरीक्षा 04 जानेवारी 2026

♦️निवड प्रक्रिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट क संवर्गातील पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच मराठी आणि इंग्रजी टंकलेखन पडताळणी होणार आहे. कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • 10 वी , 12 वी , पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • ओळखपत्र / आधार कार्ड
  • फोटो आणि सही
  • जातीचा दाखला ( लागू असल्यास)
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर

♦️अर्ज शुल्क (Application Fees) : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग रु 394/- मागासवर्गीय रु.294/- माजी सैनिक रु. 44

MPSC Group C Bharti 2025 Online Apply

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरतीसाठी उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन अधिकृत नोंदणी करावी.
  • प्रोफाइल तयार करून घ्यावी.
  • नोंदणी केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • फोटो आणि सही अपलोड करावी
  • अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे.
  • या भरतीसाठी उमेदवारांना 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत