Bank Of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन नोकरी भरती ची घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस या पदाच्या पद भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी एकूण 2700 जागांची नोकरी भरती आयोजित केली जाणार आहे.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत अप्रेंटिस भरती 2025 होणार आहे. ही भरती प्रक्रिया बँकेत करियर घडवू पाहणाऱ्या उमेदवार यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या नोकरी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. त्या वेबसाइटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.
Bank Of Baroda Recruitment 2025 Notification
बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या नोकरी भरती हे पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात झालेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे. तसेच जाहिरात नोटिफिकेशन खाली दिली आहे. ते काळजीपूर्वक वाचावे.
Bank Of Baroda Bharti 2025 Details
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- अप्रेंटिस
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 2700
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
- किमान 20 वर्षे वय असावे
- कमाल 28 वर्षापर्यंत वय असावे
- अनुसूचित जाती-जमाती त्या प्रवर्गासाठी वयामध्ये 05 सूट दिलेली आहे.
- ओबीसी 03 वर्षाचे सूट
- तसेच अपंग उमेदवारांना वयामध्ये 10 वर्षाची सूट
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | (NATS)येथे क्लिक करा (NAPS) येथे क्लिक करा |
♦️वेतन (Salary) :
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 15000 रुपये वेतन दिले जाणार आहे.
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 11 नोव्हेंबर 2025
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया : बँक ऑफ बडोदा अंतर्गत उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात होणार आहे.
- ऑनलाइन परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- स्थानिक भाषेची परीक्षा
- वैद्यकीय तपासणी
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरतीसाठी उमेदवारांना पुढील कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
- अर्जावर नोंदणी संबंधी कागदपत्रे
- शैक्षणिक कागदपत्रे ( 10 वी 12 वी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र)
- ओळखीचा पुरावा
- बँक खाते तपशील
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- तसेच इतर आवश्यक असणारी कागदपत्रे.
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक : रु . 800/- +GST
- अपंग : रु. 400/- + GST
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
Bank Of Baroda Bharti Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांनी ” Bank Of Baroda” पर्यायामध्ये Apprenticeship Opportunity. वरती जाऊन अर्ज करावा.
- आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे
- फॉर्म सबमिट करून प्रिंट घ्यावी.