India Post Payment Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ” सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक ” हे रिक्त असणारे पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक व कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या एकूण 309 रिक्त जागा भरायचे आहेत. बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना उत्तम संधी आहे. या बँक अंतर्गत उमेदवारांना अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
India Post Payment Bank Bharti Notification
इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 11 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज सादर करावा.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2025 आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल याची नोंद घ्यावी.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून तसेच अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- सहाय्यक व्यवस्थापक
- कनिष्ठ सहाय्यक
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- सहाय्यक व्यवस्थापक : 110
- कनिष्ठ सहाय्यक : 199
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
- तसेच संगणकाचा समतुल्य कोर्स असावा.
♦️वयाची अट (Age Limit) : पदानुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
- सहाय्यक व्यवस्थापक : 20 ते 35 वर्षापर्यंत
- कनिष्ठ सहाय्यक : 20 ते 32 वर्षापर्यंत
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) : या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार वेतन दिले जाणार आहे. तसेच इतर आवश्यक असलेले भत्ते सुद्धा मिळणार आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2025 आहे.
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- परीक्षा घेतली जाईल
- परीक्षेतील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
- वैयक्तिक मुलाखत
- समान गुण मिळाल्यास वयाच्या आधारे वरिष्ठ असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
- शैक्षणिक कागदपत्रे ( दहावी-बारावी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र)
- ओळखपत्र ( आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी)
- अनुभव प्रमाणपत्र
- इतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे.
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- या भरतीसाठी सर्व उमेदवारांना अर्ज फी 750 आहे.
India Post Payment Bank Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी.
- विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याचे प्रिंट काढावी.