NPCIL Bharti 2025 : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विभागामध्ये नवीन पदांची नोकरी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त असणाऱ्या पदांचे पद भरती करण्यासाठी नोकरीचे जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 122 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ” उपव्यवस्थापक ( मानव संसाधन), उपव्यवस्थापक ( वित्त व लेखा), उपव्यवस्थापक ( सी अँड एम एम), उपव्यवस्थापक ( कायदा), कनिष्ठ हिंदी अनुवादक ( जी एच टी) ” या पदांची भरती होणार आहे.
NPCIL Bharti 2025 Notification
न्यूक्लियर पॉवर ऑफ कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत होणारी भरती ही संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 7 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा.
NPCIL Bharti 2025 Details
तसेच या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवाराला पात्र ठरवले जाईल.
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून तसेच मूळ जाहिरात खाली दिलेली आहे.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पुढील पदांची भरती केली जाणार आहे.
- पदाचे नाव आणि जागांचा तपशील
| अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | उपव्यवस्थापक ( मानव संसाधन) | 31 |
| 2 | उपव्यवस्थापक ( वित्त व लेखा) | 48 |
| 3 | उपव्यवस्थापक ( सी अँड एम एम) | 34 |
| 4 | उपव्यवस्थापक ( कायदा) | 01 |
| 5 | कनिष्ठ हिंदी अनुवादक ( जी एच टी) | 08 |
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- हिंदी व इंग्रजी विषयासह पदवी उत्तीर्ण
♦️वयाची अट (Age Limit) : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा पदानुसार पुढीलप्रमाणे –
- पद क्रमांक 1 ते 4 : 18 ते 30 वर्षे पर्यंत
- पद क्रमांक 5 : 21 ते 30 वर्षापर्यंत
- ओ. बी. सी. : या प्रवर्गासाठी वयामध्ये 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 05 वर्षाची सूट.
- अपंग उमेदवार : 10 वर्षाचे सूट
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) : पदानुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे
- पद क्रमांक 1 ते 4 : रु. 86,955/- एवढे प्रति महिना वेतन आहे.
- पद क्रमांक 5 : रु. 54,870/- प्रति महिना वेतन.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 07 नोव्हेंबर 2025.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 नोव्हेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- ऑनलाइन परीक्षा
- मुलाखत
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरती प्रक्रियेसाठी पुढील कागदपत्रे उमेदवारांकडे असणे गरजेचे आहे.
- जन्मदाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- जातीचा दाखला ( लागू असल्यास)
- डोमासाईल प्रमाणपत्र.
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- पद क्रमांक 1 ते 4 : रु . 500/-
- पद क्रमांक 5 : रु.100/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार/ माजी सैनिक/ महिला यांना अर्ज शुल्क सूट देण्यात आली आहे.
NPCIL Bharti 2025 Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावे.
- अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून ऑनलाइन फॉर्म भरावा.
- फार्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी .
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी.
- त्यानंतर फॉर्म सबमिट करून त्याचे प्रिंट काढावी.