Bank of India Recruitment बँकेत मिळवण्याची सुवर्णसंधी ऑफिसर पदाची भरती ! पाहा संपूर्ण माहिती व पात्रता |

Bank of India Recruitment :बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची पद भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ‘‘चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर , लॉ ऑफिसर मॅनेजर ही पदे भरली जाणार आहेत.

बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.

बँक ऑफ इंडिया मध्ये होणारी नोकरी भरती संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अर्ज करावा. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

Bank of India Recruitment Notification

बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना आवश्यक असणारे कागदपत्रे तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे ती पण पहावी.

Bank of India Bharti Details

♦️पदाचे नाव व पदसंख्या

अ. क्र. पद पदसंख्या
1चीफ मॅनेजर15
2सीनियर मॅनेजर54
3लॉ मॅनेजर02
4मॅनेजर44

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बी.ई / बी . टेक/ एम. एस. सी ( आयटी) एलएलबी यामधून पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • तसेच पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे उमेदवारांनी कृपया जाहिरात पहावी.

♦️वयाची अट (Age Limit) : या भरतीसाठी उमेदवारांची वयाची मर्यादा पदानुसार पुढीलप्रमाणे दिलेली आहे.

  • पद क्रमांक 1 : 28 ते 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 2 : 28 ते 37 वर्षे व 25 ते 35 वर्षापर्यंत आणि 27 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 3 : 25 ते 32 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 4 : 23 ते 35 वर्षे आणि 27 ते 35 वर्षे
  • ओबीसी प्रवर्गासाठी वयामध्ये 03 वर्षाची सूट दिलेली आहे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 10 वर्षाची सूट
  • अपंग : 10 वर्षे सूट

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) : पदानुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे

  • या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना 64,820 ते 1,20,940 प्रति महिना वेतन दिले जाईल.

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 17 नोव्हेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2025

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) : बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्याने होईल.

  • उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
  • वैयक्तिक मुलाखत
  • ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखती मधून मिळणारे गुणा मधून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • शैक्षणिक कागदपत्रे ( 10 वी,12 वी, आणि पदवी प्रमाणपत्र)
  • जातीचा दाखला ( लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ ओ. बी . सी. / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 850/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग या उमेदवारांसाठी रुपये 175 /

Bank of India Recruitment Apply Online

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे.
  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी.
  • फोटो आणि सही अपलोड करा.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून प्रिंट जतन करून ठेवावी.