Northern Railway Recruitment :उत्तर रेल्वे विभागामध्ये नवीन रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती जाहीर झाली आहे. उत्तर रेल्वे अंतर्गत 4116 अप्रेंटिस पदाच्या नोकरी भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना तसेच ITI धारकांसाठी रेल्वे विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
उत्तर रेल्वे विभागामध्ये अप्रेंटिस पदाच्या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायचे आहे.
Northern Railway Bharti 2025
उत्तर रेल्वे विभागामध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 25 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा.
तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2025 आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या ची उमेदवारांनी नोंद घ्यावी. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
उत्तर रेल्वे विभागांतर्गत अप्रेंटिस पदाच्या होणाऱ्या नोकरी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
Northern Railway Bharti Details
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- अप्रेंटिस
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 4116
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावा किमान 50 टक्के गुणांसह.
- संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
- या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षापर्यंत असावे.
- तसेच कमाल वय 24 वर्ष.
- ओबीसी : 03 वर्षापर्यंत सूट
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षापर्यंत सूट
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) :
- अप्रेंटिस पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना रु, 18000/- ते 37,500/- प्रति महिना वेतन दिले जाणार आहे
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 25 नोव्हेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- उमेदवारांची निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट च्या आधारे केली जाणार आहे. (Based On 10 th +ITI Marks ).
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
- ओळखपत्र ( आधार कार्ड)
- शैक्षणिक कागदपत्रे ( दहावी मार्कशीट + ITI प्रमाणपत्र)
- जातीचा दाखला
- EWS प्रमाणपत्र
- फोटो आणि सही
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग/ ओबीसी प्रवर्ग : रु, 100/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूडी / महिला यांच्यासाठी कोणते प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
Northern Railway Bharti Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Apply Now वरती क्लिक करून नोंदणी करायची आहे.
- नोंदणी केल्यानंतर फॉर्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
- आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा