Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 :महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क संवर्गातील रिक्त असणारी पदे भरण्यासाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त असणाऱ्या पदांचे पद भरती करण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये गट अ गट ब आणि क विभागातील पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहेत.
इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/ वरिष्ठ लेखाधिकारी, लेखाधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची नोकरी भरती केली जाणार आहे.
Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. या भरतीसाठी चूक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2025 आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेवर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी खालील प्रमाणे दिलेले आहे . उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तसेच अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे ती पण पहावी.
♦️पदाचे नाव आणि पदसंख्या तपशील :
| अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | लेखापरीक्षण अधिकारी/ वरिष्ठ लेखाधिकारी | 02 |
| 2 | लेखाधिकारी | 03 |
| 3 | सहाय्यक लेखा अधिकारी | 06 |
| 4 | उपलेखापाल | 03 |
| 5 | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) | 144 |
| 6 | कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी) | 16 |
| 7 | कनिष्ठ लिपिक | 03 |
| 8 | लिपिक टंकलेखक | 06 |
| 9 | सहाय्यक भांडारपाल | 46 |
| 10 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 13 |
| 11 | उच्च श्रेणी लघुलेखक | 48 |
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : 290 पदसंख्या
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : पदानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
- या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर असावा.
- शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पाहा.
♦️वयाची अट (Age Limit) :
- खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक / अनाथ/ खेळाडू : 18 ते 43 वर्ष
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त : 18 ते 45 वर्ष
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) : या भरतीसाठी प्रति महिना वेतन पदानुसार पुढीलप्रमाणे
- पद क्रमांक 1 : रु.56,100/- ते रु.1,77,500/- इतके वेतन असेल.
- पद क्रमांक 2 व 7 साठी रु. 41,800/- ते 1,32,300/- एवढे वेतन दिले जाईल.
- पद क्रमांक 3 व 5,6,8, साठी रु. 38,600/- ते रु,1,22,800/- एवढे असेल
- पद क्रमांक 4 : रु,35,400/- ते रु. 1,12,400/- एवढे असेल.
- पद क्रमांक 9 व 10 साठी रु.19,900/- ते रु,63,200/- वेतन असेल.
- पद क्रमांक 11 साठी रु,25,500/- ते रु,81,100/- इतके वेतन दिले जाईल
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक : 20 नोव्हेंबर 2025
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2025
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2025
- परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक : परीक्षेच्या आधी सात दिवस.
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- या भरतीमध्ये उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल
- कागदपत्रे पडताळणी होईल
- अंतिम गुणवत्ता यादी नुसार उमेदवारांची निवड होईल.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
- शैक्षणिक कागदपत्रे ( 10वी 12वी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र)
- जातीचा दाखला (लागू असल्यास )
- आवश्यक असणारी कागदपत्रे
- फोटो आणि सही.
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग : रु.1000/-
- मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक / अनाथ/ दिव्यांग : रु. 900/-
- माजी सैनिक/ दिव्यांग सैनिक : त्यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 Apply Online
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाइटल भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी.
- ऑनलाइन फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी. \
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी.
- फोटो आणि सही अपलोड करावी.
- फॉर्म सबमिट करून प्रिंट काढून घ्यावी.