Bank of Baroda Bharti बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन पदांची नोकरी भरती जाहीर! पाहा संपूर्ण माहिती|

Bank of Baroda Recruitment 2025

Bank of Baroda Bharti : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन पदांची नोकरी भरती जाहीर झाली आहे. या भरती मध्ये रिक्त असणाऱ्या पदांची भरती केली जाणार आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये एकूण 82 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवार यांना नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सांगितले आहे. बँक मध्ये नोकरी करू पाहणाऱ्या तरूणांना ही सुवर्णसंधी आहे.

बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत ” झोनल रिसिव्हर मॅनेजर, रिजनल रिसिव्हर मॅनेजर, कॉम्प्लेक्स मॅनेजर, कंप्लेंट मॅनेजर, प्रोसेस मॅनेजर, वेंडर मॅनेजर , फ्लोअर मॅनेजर या रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती केली जाणार आहे. या पदासाठी एकूण 82 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Bank of Baroda Bharti 2025 Notification

बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.

भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहिले. दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार अपात्र ठरविला जाईल.

बँक ऑफ बरोडा मध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा.

Bank of Baroda Bharti Information Details

♦️पदाचे नाव व पदसंख्या तपशील :

अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
1झोनल रिसीव्ह हेबल मॅनेजर 13
2रिजनल रिसीव्ह हेबल मॅनेजर 13
3एरिया रिसीव्ह हेबल मॅनेजर 49
4कॉम्प्लेक्स मॅनेजर 01
5कंप्लेंट मॅनेजर01
6प्रोसेस मॅनेजर01
7वेंडर मॅनेजर01
8फ्लोअर मॅनेजर03
Total 82

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :

  • 82

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
  • पदानुसार अनुभव असणे गरजेचे आहे.

♦️वयाची अट (Age Limit) : पदानुसार पुढील प्रमाणे

  • पद क्रमांक 1 : 35 ते 52 वर्ष
  • पद क्रमांक 2,4,5 : 30 ते 45 वर्षे
  • पद क्रमांक 3 : 26 ते 38 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 6,7,8 : 25 ते 38 वर्ष
  • ओबीसी प्रवर्गासाठी वयामध्ये 03 वर्षाची सूट दिली आहे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती यांच्यासाठी वयामध्ये 05 वर्षाचे सवलत.
  • अपंग उमेदवार यांना 10 वर्षाची सूट देण्यात आली आहे

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) :

  • पदानुसार वेतन श्रेणी दिली जाईल, अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 19 नोव्हेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 0 9 डिसेंबर 2025

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :

  • शॉर्ट लिस्टिंग च्या आधारे
  • वैयक्तिक मुलाखत
  • गुणवत्ता यादी
  • कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • अंतिम निवड

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड/ वोटर आयडी कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( दहावी-बारावी मार्कशीट/ पदवी प्रमाणपत्र)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक असणारी कागदपत्रे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक / ओबीसी प्रवर्ग रु, 850/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला उमेदवार/ अपंग उमेदवार रु. 175/-

Bank of Baroda Bharti Online Apply

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
  • ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून फार्म मध्ये सर्व माहिती भरा.
  • उमेदवारांनी सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी.
  • फोटो आणि सही अपलोड करावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
  • फार्मर्स सबमिट करून अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.