Mahavitaran Bharti 2025! महावितरण विभाग मध्ये विविध पदांची भरती ! सरकारी नोकरीची मोठी संधी – शैक्षणिक पात्रता, पगार अर्ज प्रक्रिया पाहा|

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ( महावितरण) विभागा अंतर्गत रिक्त असणाऱ्या नवीन नोकरी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ( महावितरण) विभागाअंतर्गत पुढील पदांची नोकरी भरती केली जाणार आहे. ” अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( वितरण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( सिविल), उपकार्यकारी अभियंता ( वितरण), उपकार्यकारी अभियंता ( सिविल), वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त आणि लेखा), व्यवस्थापक ( वित्त आणि लेखा), उपव्यवस्थापक ( वित्त आणि लेखा), या पदांची नोकरी भरती केली जाणार आहे.

Mahavitaran Bharti 2025 Notification

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 300 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 29 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे. जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये अर्ज करावा.

तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेवर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची आणि अधिकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

Mahavitaran Bharti 2025 Details

♦️पदाचे नाव आणि पदसंख्या

अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
1अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( वितरण)94
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( सिविल)05
3उपकार्यकारी अभियंता ( वितरण)69
4उपकार्यकारी अभियंता ( सिविल)12
5वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त आणि लेखा)13
6व्यवस्थापक ( वित्त आणि लेखा)25
7उपव्यवस्थापक ( वित्त आणि लेखा)82

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :

  • 300

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ तंत्रज्ञान शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा.

♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे पदानुसार

  • पद क्रमांक 1,2,5,6 : 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 3, 4,7 : 35 वर्षापर्यंत
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक या उमेदवारांना वयामध्ये 05 वर्षाची सवलत दिली आहे.

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) : पदानुसार पगार पुढीलप्रमाणे

  • पद क्रमांक 1, 2 साठी रु,81,850/- ते रु . 1,84,475 प्रति महिना
  • पद क्रमांक 3,4 साठी रुपये 73, 580/- ते 1,66,555/-
  • पद क्रमांक 5 साठी : रु. 97,220 ते रु . 2,09, 445/-
  • पद क्रमांक 6 साठी : रु , 75,890/- ते रु , 1,68,865
  • पद क्रमांक 7 साठी: रु. 54,505/- ते रु , 1,37,995/-
PDF जाहिरात पद क्र. 1 ते 4 : येथे क्लिक करा
पद क्र. 5 ते 7 : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 29 नोव्हेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 डिसेंबर 2025

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :

  • भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
  • तसेच वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.

  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( 10वी 12वी मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र)
  • जातीचा दाखला ( कास्ट सर्टिफिकेट)
  • रहिवासी दाखला
  • फोटो
  • जन्मदाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • अपंग उमेदवारांना सरकारने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र.

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹500
  • मागासवर्गीय घटक/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 250 रुपये
  • अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

Mahavitaran Bharti 2025 Apply Online

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे.
  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करून घ्यावी.
  • ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर फार्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • फोटो आणि सही अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा.
  • अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.