Reserve Bank Of India Bharti 2025 ! रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या नोकरी भरतीला सुरुवात, असा करा ऑनलाईन अर्ज|

Reserve Bank Of India 2025

Reserve Bank Of India 2025 : रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन रिक्त असणाऱ्या पदांच्या नोकरी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध तज्ञ पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध तज्ञ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 17 डिसेंबर 2025 पासून झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर तात्काळ अर्ज करावा.

तसेच या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2026 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याचे इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी/ उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

  • विविध तज्ञ पदे

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :

  • 93

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगळेवेगळे आहे.
  • सर्वसाधारण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. ई / बी .टेक/ एमबीए/सी. ए/एम. सी. ए/ विषयामध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरात पहा.

♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे

  • या भरतीसाठी उमेदवारांचे कमीत कमी वय हे 21/25/27/28/30/35/40/ वर्ष ते जास्तीत जास्त वय 40/45/62 वर्षापर्यंत असावे
  • प्रत्येक पदानुसार वयाची अट वेगवेगळी आहे.
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • अपंग उमेदवारांना 10 वर्षापर्यंत वयामध्ये सूट दिलेली आहे

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) :

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहे. तसेच इतर भत्ते सुद्धा मिळणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 17 डिसेंबर 2025
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जानेवारी 2026

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :

  • या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाची छाननी केली जाईल.
  • वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
  • कागदपत्रांची पडताळणी
  • अंतिम निवड व नियुक्ती केली जाईल

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • ओळखपत्र ( आधार कार्ड पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला ( कास्ट सर्टिफिकेट)
  • रहिवासी दाखला
  • जन्मदाखला
  • फोटो आणि सही

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना रु. 600/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अपंग उमेदवारांना रु.100/-

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्यानंतर फार्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावेत.
  • फोटो आणि सही अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून जतन करून ठेवा