Bank of India Credit Officer Bharti ! बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर पदाची मेगा भरती जाहीर , पाहा संपूर्ण जाहिरात|

Bank of India Credit Officer Bharti : बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदासाठी नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 514 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बँक ऑफ इंडिया मार्फत क्रेडिट ऑफिसर पदाच्या पद भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे.

बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदाच्या 514 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2026 आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता शेवटच्या तारखेला अर्ज करावा.

शेवटच्या तारखेनंतर आलेले कोणत्याही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले अधिकृत जाहिरात वाचावी. ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे.

बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदाच्या भरती विषयी सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतन श्रेणी, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, परीक्षा पद्धत, या सर्व बाबी खाली दिलेल्या आहेत उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे.

♦️पदाचे नाव आणि पदसंख्या तपशील :

अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 क्रेडिट ऑफिसर SMGS – IV36
2 क्रेडिट ऑफिसर MMGS – III60
3 क्रेडिट ऑफिसर MMGS – II
418

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच संबंधित पदासाठी आवश्यक बँकिंग क्षेत्रातील/ क्रेडिट पदाचा अनुभव असावा.

♦️वयाची अट (Age Limit) : पदानुसार वयोमर्यादा पुढील प्रमाणे

  • क्रेडिट ऑफिसर SMGS – IV : 30 ते 40 वर्षापर्यंत
  • क्रेडिट ऑफिसर MMGS – III : 28 ते 38 वर्षापर्यंत
  • क्रेडिट ऑफिसर MMGS – II : 25 ते 35 वर्षापर्यंत
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाचे सवलत.
  • ओबीसी : 03 वर्षाची सूट
  • अपंग उमेदवार : 10 वर्षाची सूट दिली आहे.

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) : पदानुसार वेतन श्रेणी

  • क्रेडिट ऑफिसर SMGS – IV : रु, 1,02,300/- ते रु, 1,20, 940/- प्रति महिना
  • क्रेडिट ऑफिसर MMGS – III : रु. 85,920/- ते रु, 1,05, 280/- प्रति महिना
  • क्रेडिट ऑफिसर MMGS – II : रु. 64,820 ते रु, 93,960/- प्रति महिना

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 20 डिसेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :

  • अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
  • वैयक्तिक मुलाखत

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( दहावी मार्कशीट/ 12 वी मार्कशीट/ पदवी प्रमाणपत्र)
  • जातीचा दाखला ( लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • फोटो आणि सही
  • इतर आवश्यक कागदपत्रे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक/ ओबीसी : रु. 850/-
  • अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार : रु.175/-

♦️ महत्वाच्या सूचना :

  • बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही एक सुवर्णसंधी आहे.
  • एका उमेदवाराने एकाच पदासाठी अर्ज करायचा आहे
  • अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात वेळोवेळी पहा.

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • नवीन नोंदणी करून फॉर्म भरावा.
  • आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावी.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे.
  • सर्व माहिती बरोबर असल्याचे खात्री करून अर्ज सबमिट करावा.
  • प्रिंट काढून घ्या.