SBI CBO Recruitment 2026! स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरीची संधी , 2,273 जागांची मेगा भरती जाहीर! पाहा ऑनलाइन अर्ज|

SBI CBO Recruitment 2026 :सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्कल बेस्ड ऑफिसर या पदाच्या नोकरी भरती ची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या पद भरतीसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये 2050 नियमित पदे आणि 223 बॅकलॉग पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये संपूर्ण 2273 जागांचे नोकरी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे.

SBI CBO Bharti 2026

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 29 जानेवारी 2026 पासून झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज सादर करावा.

SBI Bharti Notification

तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2020 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्कल बेस्ड ऑफिसर पदाची नोकरी भरती केली जाणार असून या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत लिंक दिलेली आहे. तसेच अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • सर्कल बेस्ड ऑफिसर

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 2273

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच मेडिकल, इंजीनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यासारखी शैक्षणिक पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • या सर्कल साठी अर्ज करणार आहे त्या सर्कलच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ( वाचणे, लिहिणे, बोलणे)

♦️ वयाची अट (Age Limit)

  • उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे पूर्ण असावे.
  • तसेच कमाल 30 वर्षापर्यंत असावे.
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • अपंग उमेदवार : 10 वर्षाचे सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रु, 48,480/- इतके प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
  • दोन इन्क्रिमेंट मिळतील.
  • याव्यतिरिक्त D. A, H. R. A वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक भत्ते मिळणार आहेत.

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 29 जानेवारी 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा : मार्च 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
  • स्क्रिनिंग
  • वैयक्तिक मुलाखत
  • स्थानिक भाषा चाचणी

♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)

  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • फोटो & स्वाक्षरी
  • इतर आवश्यक कागदपत्रे

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी / आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक रु, 750/- आहे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन फी पद्धतीने भरावी.
  • भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

SBI CBO Bharti 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा

या भरतीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन

1️⃣ ऑनलाईन अर्ज: SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा – sbi.co.in / sbi.bank.in

2️⃣ अर्ज फॉर्म भरा (संपूर्ण माहिती)

3️⃣ आवश्यक दस्तऐवज अपलोड करा (Photo, Signature, ID इ.)

4️⃣ फी भरा (जर लागू असेल तर)

5️⃣ शेवटी फॉर्म सबमिट करून प्रिंट काढा

🧑‍💼 SBI CBO Recruitment – महत्वाचे मुद्दे

✅ इच्छुक उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पूर्ण वाचावं.

✅ एकाच सर्कलमध्येच अर्ज करायचा आहे आणि त्याच्या भाषा अर्हतेला प्राधान्य द्यावं.

✅ परीक्षेची तारीख आणि Admit Card नंतर SBI कडून जाहीर होईल.