RRB Group D Bharti 2026 : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 22, 195 जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी आणि रेल्वे विभागामध्ये नोकरीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वे विभागाने यावर्षी सर्वात मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
भारतीय रेल्वे विभागाअंतर्गत ट्रक मेंटेनर, पॉइंटस मन, असिस्टंट या पदाचे भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय झालेल्या उमेदवारांना रेल्वे विभागामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
RRB Group D Bharti 2026 Details
रेल्वे विभागामध्ये होणाऱ्या नोकरी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. भारतीय रेल्वे विभागा मध्ये 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.
RRB Group D Recruitment 2026
भारतीय रेल्वे विभागामध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांनी 31 जानेवारी 2026 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2026 आहे. जे उमेदवारी चूक असतील त्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आपला अर्ज सादर करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
RRB Group D Bharti 2026 Details
भारतीय रेल्वे विभागामध्ये होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| अ. क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ट्रक मेंटेनर | 11,032 |
| 2 | पॉइंटस मन | 5,053 |
| 3 | असिस्टंट | 6,110 |
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून आयटीआय पूर्ण केलेला असावा.
♦️ वयाची अट (Age Limit)
- 18 वर्षे पूर्ण असावे
- कमाल 33 वर्षापर्यंत
- ओबीसी : 03 वर्षाचे सवलत
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- अपंग उमेदवार : 10 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- संपूर्ण भारत
RRB Group D Bharti 2026 Apply Website
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️वेतन श्रेणी (Pay Scale) RRB Group B Bharti 2026 या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे.
- या भरती प्रक्रियेतील सर्व पदे हे मॅट्रिक्स लेवल एकचे आहेत.
- उमेदवारांना सुरुवातीचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल.
- मूळ वेतनात केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांना अनेक भत्ते सुद्धा दिले जातात.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 31 जानेवारी 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मार्च 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांची संगणक आधारित चाचणी होईल
- शारीरिक कार्यक्षमता तपासणी
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग : रु, 500/- इतके अर्ज शुल्क आहे.
- उमेदवाराने संगणक परीक्षा दिल्यास त्यांना 400 /- परत मिळतील.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ अपंग उमेदवार/ महिला उमेदवार/ ट्रांसजेंडर/ अल्पसंख्यांक/ आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग या उमेदवारांसाठी रु,250/- शुल्क आहे.
- उमेदवारांनी संगणक परीक्षा दिल्यास त्यांना 250 रुपये परत मिळतील.
- अर्ज शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
RRB Group D Bharti 2026 Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- या भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
- क्रिएट अकाउंट या लिंक वर क्लिक करून अकाउंट ओपन करावे.
- ज्या उमेदवारांचे या अगोदर खाते असेल त्यांनी लॉग इन करावे.
- लॉगिन केल्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
- सर्व माहिती बरोबर भरल्याचे खात्री करून अर्ज सबमिट करावा.
- तसेच अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट काढून घ्या.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- रेल्वे विभागामध्ये 10 वी उत्तीर्ण साठी ही एक सुवर्णसंधी आहे.
- या भरतीसाठी उमेदवाराला एकाच वेळी अर्ज करता येणार आहे.
- त्यापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज रद्द केले जातील.
- उमेदवाराने कोणत्याही एका रेल्वे बोर्डाचे निवड करणे आवश्यक आहे. एकदा निवड केलेला झोन कोणत्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही.
- संगणक आधारित परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण कापले जातील.