Indian Bank Sportspersons Bharti 2026 : खेळाडू उमेदवारांसाठी इंडियन बँकेतर्फे नोकरी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडियन बँक मध्ये खेळाडू असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी फक्त खेळाडू असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या उमेदवारांसाठी इंडियन बँक मध्ये नोकरीसाठी चांगली संधी आहे.
मित्रांनो मी एक उत्तम खेळाडू असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी इंडियन बँकेतर्फे एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. इंडियन बँकेमध्ये ऑफिसर आणि क्लर्क या पदासाठी सुरू झालेली आहे.
इंडियन बँक मध्ये जे उमेदवार नोकरीसाठी इच्छुक असतील त्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाइटवरून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
Indian Bank Sportspersons Bharti 2026 Details
इंडियन बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी खेळाडू उमेदवारांची भरती केली जाणार असून यामध्ये ॲथलेटिक्स, बास्केट बॉल, हॉलीबॉल, आणि बुद्धिबळ यासारख्या निवडक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराच्या निवडीनंतर चेन्नई आणि देशातील विविध मध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडू असण्याबरोबर उमेदवार हा शारीरिक तंदुरुस्त आणि कौशल्य चाचणी मध्ये पारंगत असावा. या भरतीमध्ये एकूण ऑफिसर अनेक क्लर्क पदाच्या 07 जागा भरल्या जाणार आहेत.
इंडियन बँक मध्ये उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- ऑफिसर
- क्लर्क ( लिपिक)
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 07
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच संगणकीय ज्ञान असावे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्ष पर्यंत असावे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षाची सवलत दिली आहे.
- ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षाची सूट दिलेली आहे.
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- संपूर्ण भारत
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale) पदानुसार पुढील पगार
- ऑफिसर : ऑफिसर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना Rs- 48,480/- ते Rs- 85,920/- इतके प्रति महिना वेतन असणार आहे.
- क्लर्क : क्लर्क या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना Rs- 24,050/- ते Rs- 64,480/- इतके प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात : 4 फेब्रुवारी 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2026
- ऑनलाईन फी भरण्याची मुदत : 4 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- इंडियन बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही पुढील तीन टप्प्याने प्रमाणे होणार आहे.
- अर्जाची छाननी : उमेदवाराच्या अर्जातील माहिती, वय आणि खेळातील कामगिरी नुसार उमेदवाराला गुण दिले जातील. ऑफिसर पदासाठी 40 तर क्लर्क पदासाठी 55 गुण स्क्रिनिंगला आहेत.
- फिल्ड ट्रायल : निवड केलेल्या उमेदवारांना मैदानावरील चाचणी घेतली जाईल. यामध्ये उमेदवाराची शारीरिक क्षमता, वेग आणि खेळाचे कौशल्य तपासले जाईल. यासाठी 30 ते 45 गुण राखीव आहेत.
- मुलाखत : या भरतीमध्ये मुलाखत फक्त ऑफिसर पदासाठी घेतली जाणार आहे.
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
- ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
- शैक्षणिक आणि वयाचा पुरावा
- क्रीडाविषयक असलेली प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला ( आरक्षित असेल तर)
- इतर आवश्यक असलेली कागदपत्रे
♦️ अर्ज शुल्क (Fees) Indian Bank Sportspersons Vacancy 2026 अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे
- सामान्य प्रवर्ग/ ओबीसी/EWS : ₹1000/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार : 175 रुपये/-
- हे कोणत्याही परिस्थितीत ना परतावा आहे.
Indian Bank Sportspersons Bharti 2026 Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इंडियन बँकेचा अधिकृत वेबसाईट वरती जावे.
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर नवीन नोंदणी करून वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
- आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावीत.
- फोटो आणि सही अपलोड करा.
- अर्ज फी भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- इंडियन बँकेमध्ये होणाऱ्या भरतीसाठी फक्त खेळाडू उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
- इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज केलेला स्वीकारला जाणार नाही.
- जे उमेदवार राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरा वरती खेळलेले आहेत त्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.