Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026!  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 जागांसाठी भरती ! 12 पास इथे अर्ज करा|

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 :छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या पद भरतीसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 222 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण , 12 वी उत्तीर्ण, पदवीधर असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खाली अतिक लिंक दिली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Notification

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च2026 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तसेच इतर आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2026

♦️ पदाचे नाव & पदसंख्या :

अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
1कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य)32
2उप अग्निशमन केंद्र अधिकारी04
3सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
4स्थापत्य अभियांत्रिकी/ अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक24
5स्वच्छता निरीक्षक12
6पशुधन पर्यवेक्षक07
7चालक- यंत्र चालक15
8उद्यान सहाय्यक/ कृषी सहाय्यक06
9अनु लेखक09
10अग्निशामक100
11रोखपाल12
Total 222

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) शैक्षणिक पात्रता हे पदानुसार पुढीलप्रमाणे दिलेली आहे.

  • पद क्रमांक 1 : स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी.
  • पद क्रमांक 2 : स्टेशन ऑफिसर आणि उपासना अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर.
  • पद क्रमांक 3 : कोणत्याही शाखेतील पदवी, लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पदवी अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्रमांक 4 : स्थापत्य, अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • पद क्रमांक 5 : मान्यता भक्त विद्यापीठाची पदवी , स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
  • पद क्रमांक 6 : 12 वी उत्तीर्ण., पशुसंवर्धन डिप्लोमा + 02 वर्षाचा अनुभव.
  • पद क्रमांक 7 : 10 वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, जड वाहन चालक परवाना + 03 वर्षाचा अनुभव.
  • पद क्रमांक 8 : बी.एस.सी ( हॉर्टिकल्चर) अग्रिकल्चर/ बॉटनी/ फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पती शास्त्रातील पदवी + 03 वर्षाचा अनुभव.
  • पद क्रमांक 9 : 10 वी उत्तीर्ण + ITI
  • पद क्रमांक 10 : 10 वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  • पद क्रमांक 11 : B.com , संगणकावर मराठी टंकलेखन आणि इंग्रजी टंकलेखन

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 18 ते 40 वर्षापर्यंत.
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाचे सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ मागासवर्गीय : 05 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026
  • ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख : परीक्षेच्या आधी सात दिवस.
  • ऑनलाइन परीक्षा दिनांक : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • भरतीसाठी उमेदवारांची परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाईल

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • अनाथ/ मागासवर्गीय : 900/-
  • माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावे.
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर संबंधित फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी.
  • फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावे.
  • इतर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क भरावे.
  • सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट भरावा.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अंतर्गत होणारी भरती ही दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.
  • या भरतीमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.
  • इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली पात्रता आणि कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे याचा तपशील पहावा.