BEL Bharti 2025
BEL Bharti 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांची पद भरती सुरू झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये रिक्त असणाऱ्या जागांची भरती करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 610 पदे भरली जाणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.
BEL Bharti 2025 Notification 2025
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी मध्ये एकूण 610 रिक्त पदे भरली जाणार असून, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आलेली आहे. या भरती मधून इंजिनियर -I या पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 24 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
BEL Bharti Details 2025
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये होणाऱ्या नोकरी भरती ची सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
♦️पदाचे नाव (Name of the Posts )
या भरती प्रक्रियेमध्ये इंजिनीयर -I (TEBG), TEEM या पदांची पद भरती केली जाणार आहे.
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी मध्ये एकूण 610 रिक्त जागांची पदभरती होणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी मध्ये एकूण 610 रिक्त जागांची पदभरती होणार आहे.
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे दिलेली आहे.
- B,E/B.Tech/ B.sc ( इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल) यापैकी कोणत्याही एका विषयातून उमेदवाराने पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे –
- 1 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती (SC/ST) : 05 वर्षाची सूट
- ओ.बी.सी (OBC)
♦️नोकरी ठिकाण (Job Location) :
या भरती प्रक्रियेतून अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंतर्गत कुठेही पोस्टिंग मिळू शकते.
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
♦️वेतन (Salary) :
उमेदवारांना कालावधी टप्प्यानुसार वेतन श्रेणी पुढील प्रमाणे –
- पहिल्या वर्षासाठी 30,000 रुपये प्रति महिना
- दुसऱ्या वर्षासाठी 35 हजार रुपये प्रति महिना
- तिसऱ्या वर्षानंतर 40 हजार रुपये प्रति महिना
♦️महत्त्वाच्या तारखा (Important Dates ) :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 24 सप्टेंबर 2025.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2025.
- ऑनलाइन अर्ज भरलेल्या उमेदवारांची परीक्षा ही 25 &26 ऑक्टोबर 2025 रोजी होईल.
♦️निवड प्रक्रिया :
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून शॉर्टलिस्ट मेरिट च्या आधारे केली जाईल.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
या भरती संदर्भात उमेदवारांना पुढील कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे.
- ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड/ पॅन कार्ड/ वोटर आयडी कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन/ पासपोर्ट). यापैकी कोणत्याही एक.
- शैक्षणिक प्रमाणपत्रे : 10वी , 12वी, पदवी प्रमाणपत्र.
- ऑनलाइन अर्ज भरल्याची पावती
BEL Bharti Online Apply 2025
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
- अधिकृत वेबसाईट वरती लॉगिन करून ऑनलाइन फॉर्म मध्ये आवश्यक ती काळजीपूर्वक भरावी.
- आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
- ऑनलाईन अर्ज शुल्क भरल्याची प्रिंट काढून जतन करून ठेवावी.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.