BSF Constable GD Sports Quota Bharti 2025 : भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये खेळाडू उमेदवारांसाठी नवीन नोकरी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय सीमा सुरक्षा दल अंतर्गत खेळाडू उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 549 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडू उमेदवारांसाठी भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरीसाठी उत्तम संधी आहे.
BSF Constable GD Sports Quota Bharti 2025 Notification
भारतीय समाज सुरक्षा दलामध्ये खेळाडू उमेदवारा द्वारे कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) हे पद भरले जाणारा आहे. ही भरती प्रक्रिया खेळाडू कोट्या मार्फत राबविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला आहे, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे अशा उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये होणारी भरती ही संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.
BSF Constable GD Sports Quota Bharti 2025 Details
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 आहे. ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी आणि अर्ज करण्यासाठी खाली अधिकृत लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या मार्फत उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- कॉन्स्टेबल जनरल ड्युटी
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 549
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : भारतीय सीमा सुरक्षा दलात खेळाडू उमेदवारांसाठी होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
- अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच उमेदवाराने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा.
- आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
- मान्यताप्राप्त फेडरेशन किंवा असोसिएशन मार्फत प्रमाणपत्र.
- फक्त खेळाडू उमेदवारांच्या साठी ही भरती आयोजित केली आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
- खुला प्रवर्गातील उमेदवार 18 ते 23 वर्षे पर्यंत वय असावे
- ओबीसी प्रवर्ग 18 ते 26 वर्ष
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) :
- या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवाराला रु21,700/- ते रु. 69,100/- प्रति महिना वेतन असेल.
- इतर आवश्यक असलेले भत्ते मिळणार आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 27 डिसेंबर 2025
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2026
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) : या भरतीमध्ये उमेदवारांची पुढीलप्रमाणे निवड प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
- उमेदवारांचे कागदपत्र तपासणी केली जाणार आहे.
- क्रीडा चाचणी
- शारीरिक तपासणी
- वैद्यकीय तपासणी
- अंतिम गुणवत्ता यादी
- याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
- 10 वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
- आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले प्रमाणपत्र.
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी शासनाने जारी केलेले प्रमाणपत्र.
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी/ ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.159 इतके अर्ज शुल्क आकारले आहे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवार/ मागासवर्गीय घटकातील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
♦️ महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्जामध्ये सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BSF Constable GD Sports Quota Bharti 2025 Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर अर्जामध्ये सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी.
- आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर भरल्याचे खात्री करून , अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.