Dhule Nandubar District Bank Bharti 2026! जिल्हा बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 64 जागांची भरती इथे करा ऑनलाईन अर्ज

Dhule Nandubar District Bank Bharti 2026 : धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा बँकेमध्ये चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक (Clerk), तांत्रिक (Technical) या रिक्त असणाऱ्या पदांचे पद भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 70 टक्के जागा राखीव आहेत. उर्वरित 30 टक्के जागा या इतरांसाठी आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 13 फेब्रुवारी 2026 पासून झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2026 आहे.

इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ अर्ज करावा. उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

भरती ची संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, आणि अधिकृत जाहिरात याची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहा.

♦️ पदाचे नाव व पदसंख्या :

अ . क्र पदाचे नाव पदसंख्या
1 लिपिक (क्लर्क )50
2 तांत्रिक पदे 14

तांत्रिक विभागात असिस्टंट मॅनेजर, सीनियर ऑफिसर JM-I, सीनियर ऑफिसर JM-II , लिपिक, सहाय्यक, शिपाई या पदांचा समावेश आहे.

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • लिपिक पदासाठी : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक पदे : या पदासाठी B.E / B.Tech (Computer/IT/Electronics),M.C.A किंवा B.C.A पदवी असणे आवश्यक आहे.
  • शिपाई पदासाठी किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत आहे.
  • राखीव प्रवर्ग अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती यांच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत आहे.

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • धुळे आणि नंदुरबार जिल्हा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale) पदानुसार पुढील पगार

  • या भरतीमध्ये उमेदवारांना सुरुवातीला एक वर्षाचा प्रोफेशन पिरियड असेल, त्या काळात उमेदवाराला प्रति महिना मिळणारा पगार-
  • लिपिक/ सहाय्यक : 15000 रुपये/-
  • असिस्टंट मॅनेजर : 25000 रुपये/-
  • सीनियर ऑफिसर JM-I, सीनियर ऑफिसर JM-II : 20000 रुपये/-
  • शिपाई : 10,000 रुपये

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2026 पासून
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रे पडताळणी
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग : 825/- (GST)
  • राखीव प्रवर्ग – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती : रु, 705 /- (GST)

♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा

  • या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट जाऊन नोंदणी करावी.
  • New Registration वर क्लिक करून नोंदणी करावी.
  • उमेदवारांनी सर्व वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी.
  • फोटो, सही आणि अपलोड करावी.
  • स्कॅन करून डॉक्युमेंट अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी उमेदवाराला एका पदासाठी अर्ज करता येणार आहे. एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करता येणार नाही
  • अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला बँकेमध्ये किमान दोन वर्षे सेवा करण्याबाबत करार पत्र लिहून द्यावे लागेल.
  • धुळे नंदुरबार जिल्हा बँकेमध्ये पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी बँकेमध्ये नोकरीची संधी आहे.
  • बँकेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे.
  • शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा.
  • या भरतीसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 70 टक्के जागा राखीव आहेत.
  • इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30 टक्के जागा खुल्या करण्यात आले आहेत.