DRDO STA B Bharti 2025! DRDO मध्ये सीनियर टेक्निकल असिस्टंट – बी व टेक्निशियन – ए या पदांची नवीन नोकरी भरती जाहीर ! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या |

DRDO STA B Bharti 2025

DRDO STA B Bharti 2025 :जे तरुण / विद्यार्थी सरकारी नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी नवीन नोकरी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 764 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत होणारी भरती ही संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 11 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज शक्य तितक्या लवकर सादर करावा.

तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2026 आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. संबंधित उमेदवाराला पात्र ठरविले जाईल.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक दिलेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

  • सीनियर टेक्निकल असिस्टंट – बी
  • टेक्निशियन -ए

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :

  • 764

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा बी. एस. सी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • आय. टी. आय

♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे

  • खुला प्रवर्ग : 18 ते 28 वर्षापर्यंत
  • ओबीसी उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या उमेदवारांना वयामध्ये 05 वर्षाची सूट दिलेली आहे.
  • अपंग उमेदवारांना 10 वर्षाची सूट.

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत होणाऱ्या नोकरी भरती मध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार प्रति महिना वेतन पुढील प्रमाणे-

  • सीनियर टेक्निकल असिस्टंट- बी : रु. 35,400/- ते रु, 1,12,400/- इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.
  • टेक्निशियन – ए : रु.19,900/- ते रु. 63.200/- हे मासिक वेतन दिले जाणार आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 11 डिसेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 01 जानेवारी 2026

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे अंतर्गत ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्याने केली जाणार आहे.

  • टिअर -I संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल. (CBT)
  • टिअर II परीक्षा ( विषय विशेष ज्ञानावर आधारित)
  • ट्रेड टेस्ट (Technician – A साठी पात्रता आधारित)
  • ऑनलाइन परीक्षेनंतर उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी केले जाईल.
  • वैद्यकीय तपासणी

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( दहावी मार्कशीट. पदवी प्रमाणपत्र)
  • जात सर्टिफिकेट ( लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • इतर आवश्यक महत्त्वाचे कागदपत्रे

♦️अर्ज शुल्क (Application Fees) : पदानुसार अर्ज शुल्क

  • सीनियर टेक्निकल असिस्टंट – बी
  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक : रु.750/-
  • महिला/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार/ माजी सैनिक : रु.500/-
  • टेक्निशियन -ए
  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटकातील उमेदवार : रु.600/-
  • महिला/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार/ माजी सैनिक : रु.500/-

♦️ महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी.
  • दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत होणारी भरती ही देशाच्या संरक्षणासाठी थेट योगदानाची संधी आहे.
  • उमेदवारांना राष्ट्रसेवा करण्याची इच्छा आहे त्या तरुणांसाठी DRDO तुम व्यासपीठ आहे.

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • सर्वप्रथम अधिकृत संकेत साला भेट द्यावी.
  • नोंदणी करा.
  • ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे.
  • कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • संपूर्ण अर्जाची तपासणी करून अर्ज सबमिट करावा.