IB MTS Bharti 2025
IB MTS Bharti 2025 :भारत सरकारच्या गुप्तचर विभागामध्ये नवीन पदांची नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ हे पद भरले जाणार आहे. भारत सरकारच्या गुप्तचर विभागात अंतर्गत एकूण 362 रिक्त जागा भरायच्या आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
मल्टी टास्किंग या पदासाठी 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवायचे आहे त्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच या भरतीसाठी 18 ते 25 वय वर्षे असलेले उमेदवार पात्र आहेत.
IB MTS Bharti 2025 Notification
भारत सरकारच्या गुप्तचर विभागामध्ये होणाऱ्या मल्टी टास्किंग पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 22 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. तसेच अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी ते काळजीपूर्वक वाचा.
भारत सरकारच्या गुप्तचर विभागामध्ये मल्टी टास्किंग पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती नीट वाचून अर्ज करायचा आहे.
IB MTS Bharti 2025 Details
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- मल्टी टास्किंग
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 362
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःच्या राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र गरजेचे आहे.
♦️वयाची अट (Age Limit) : या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
- खुला प्रवर्ग : 18 ते 25 वर्षापर्यंत
- ओबीसी : 18 ते 28 वर्षापर्यंत
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवार : 18 ते 30 वर्षे
- अपंग उमेदवार : 18 ते 35 वर्षे
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) :
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 18000 रुपये ते 56 हजार 900 इतके प्रति महिना वेतन मिळणार आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 22 नोव्हेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) : भारत सरकारच्या गुप्तचर विभागामध्ये मला स्टेटस पदासाठी पुढील टप्प्याने निवड प्रक्रिया होईल.
- ऑनलाइन परीक्षा
- अंतिम गुणवत्ता यादी
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- दहावी मार्कशीट
- ओळख पत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
- जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- रहिवासी ( डोमासाईल सर्टिफिकेट)
- पासपोर्ट साईज फोटो
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ ओबीसी प्रवर्ग रुपये 650/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला/ अपंग उमेदवार यांच्यासाठी 550 अर्ज शुल्क आहे.
IB MTS Bharti 2025 Apply Online
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- कागदपत्रे अपलोड करा.
- फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करावा.
- त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.