India Post GDS Bharti 2026 ! 10 वी पास उमेदवार यांना इंडिया पोस्ट विभागात सरकारी नोकरीची संधी 28,740 जागांसाठी भरती , असा करा ऑनलाइन अर्ज|

India Post GDS Bharti 2026 : इंडिया पोस्ट विभागांतर्गत नवीन रिक्त असणाऱ्या जागांची नोकरी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इंडिया पोस्ट GDS पदाच्या ग्रामीण डाक सेवक हे पद भरले जाणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या साठी हे एक सरकारी नोकरीचे संधी आहे. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.

इंडिया पोस्ट विभागाअंतर्गत 28,740 जागांची मेगा भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. इंडिया पोस्ट विभागामध्ये उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करावा.

इंडिया पोस्ट विभागाकडून भरती प्रक्रियेसाठी ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ऑफ ब्रांच पोस्टमास्टर, डाक सेवक या पदाची भरती केली जाणार आहे. त्यामुळे 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.

इंडिया पोस्ट विभागांतर्गत होणाऱ्या मेगा भरती साठी 10वी पास असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये पोस्ट विभागाकडून ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही परीक्षा नाही. 10वी पास वरती थेट भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

इंडिया पोस्ट विभागामध्ये आर्या उमेदवारांना 31 जानेवारी 20 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये वन टाइम रजिस्ट्रेशन करून घ्यावे. उमेदवारांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 2 फेब्रुवारी 2020 पासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2026 आहे. जर उमेदवारांच्या कडून ऑनलाईन अर्ज करताना काही चूक झाली असेल तर 18 फेब्रुवारी पर्यंत दुरुस्ती करता येणार आहे. त्यासाठी विंडो खोली ठेवण्यात येणार आहे.

पोस्ट विभागामध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज कसा करायचा जाहिरात पीडीएफ तसेच इतर आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचा.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • ब्रांच पोस्टमास्टर
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
  • डाक सेवक

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 28,740

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पोस्ट विभागामध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 10 वी मध्ये गणित आणि इंग्रजी विषय असणे गरजेचे आहे.
  • तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवता येणे आवश्यक आहे.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची किमान व हे 18 वर्ष पूर्ण असावे.
  • कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असावे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट दिलेली आहे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी वयामध्ये पाच वर्षाची सवलत दिली आहे.
  • अपंग उमेदवारांना 10 वर्षाची सूट दिलेली आहे.

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️वेतन श्रेणी (Pay Scale) प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार खालील प्रमाणे वेतन असेल

  • ब्रांच पोस्ट मास्टर : रु.12,000/- ते रु. 29,380/-
  • असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर : रु, 10000/- ते रु, 24,470/-
  • डाक सेवक : रु, 10000/- ते रु, 24,470/-

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन रजिस्ट्रेशन : 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026
  • अर्ज सादर करणे आणि अर्ज शुल्क भरणे : 02 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026
  • अर्ज दुरुस्ती : 18 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026.

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही.
  • 10वी च्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.
  • तसेच उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग या उमेदवारांसाठी रु. 100/- इतके अर्ज शुल्क आहे
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / अपंग उमेदवार/ महिला उमेदवार त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
  • अर्ज शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. इतर कोणत्याही स्वरूपात अर्ध शुल्क स्वीकारले जाणार नाही.

♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय करून घ्यावे.
  • उमेदवाराने दहावीचा निकाल फोटो आणि सही अपलोड करावे.
  • ज्या विभागात नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्या विभागाची निवड करा.
  • अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि पेमेंट रिसीट काढून घ्या.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज हा अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून करावा.
  • एका उमेदवाराने एकाच पदासाठी अर्ज करावा.
  • उमेदवारांनी अर्ज हा दिलेल्या वेळेमध्ये करावा.
  • उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
  • ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही एक सरकारी नोकरीची चांगली संधी आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करावा. जेणेकरून सरकारी नोकरी मिळवता येईल.