Janata Sahakari Bank Satara Bharti 2026! जनता सहकारी बँक सातारा येथे नोकरीची संधी ; बँकेत नोकरी मिळवा असा करा ऑनलाईन अर्ज |

Janata Sahakari Bank Satara Bharti 2026 :बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाचे चांगली बातमी आहे. जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेमध्ये रिक्त असणाऱ्या पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जनता सहकारी बँकेमध्ये लिपिक पदाच्या 60 जागांसाठी नोकरी भरती राबवली जाणार आहे.

जनता सहकारी बँकेमध्ये बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली लिंक दिलेली आहे.

Janata Sahakari Bank Satara Bharti 2026 Notification

जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये होणारी नोकरी भरती हि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन मार्फत केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2026 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा शेवटच्या तारखेची वाट न पाहता.

Janata Sahakari Bank Satara Bharti 2026 Details

मित्रांनो तुम्ही जर पदवीधर आणि बँकेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी सातारा येथील जनता सहकारी बँकेमध्ये नोकरीसाठी चांगली संधी आहे. यामध्ये लिपिक या पदाची भरती केली जाणार आहे.

जनता सहकारी बँक सातारा येथे उमेदवारांना नोकरी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • लिपिक

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 60

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • MS-CIT किंवा समतुल्य कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
  • बँकिंग क्षेत्रातील अनुभव किंवा बँकिंग क्षेत्रातील का असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • उमेदवाराची किमान वय हे 22 वर्षापर्यंत असावे.
  • कमाल वय 35 वर्षे

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • सातारा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • उमेदवाराला प्रशिक्षण काळात रु. 6,500/- (PF आणि Gratuity )
  • कायमस्वरूपी नोकरी झाल्यानंतर रु. 11,000/- (PF आणि Gratuity)

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 20 फेब्रुवारी 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मार्च 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • उमेदवाराची अंतिम निवड प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
  • मुलाखत
  • ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असेल.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा आहे.
  • परीक्षा 100 गुणांची अस राहील.
  • ऑनलाइन परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत आयोजित केली जाईल.

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 1180/- इतके अर्ज शुल्क आहे.
  • हे अर्ज शुल्क ना परतावा असेल.
  • परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट माध्यमातूनच भरावे लागेल.
  • परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे न भरल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल.
  • ऑनलाइन पेमेंट अपडेट होण्याकरता 24 ते 48 तास लागू शकतात.
  • उमेदवारांचे पेमेंट अपडेट झाल्यानंतर त्यांनी आपल्या अर्जाची प्रत आपल्याकडे जपून ठेवावे.

Janata Sahakari Bank Satara Bharti 2026 Online Apply

♦️ ऑनलाइन अर्ज

  • या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जावे.
  • उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल.
  • अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
  • उमेदवाराने त्याचा फोटो आणि सही अपलोड करावे.
  • अर्ज शुल्क भरावे.
  • अर्जदाराने अपलोड केलेले फोटो सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरवले जाऊ शकते याची नोंद घ्यावी.
  • सदर पेज वरील सर्व माहिती भरल्यानंतर व छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर सबमिट यावर क्लिक करावे.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा या ठिकाणी होणारी भरती ही उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.
  • बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना हा एक चांगला पर्याय आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवाराला परीक्षा प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत सातारा येथे आयोजित केली जाणार आहे.
  • नोकर भरती विषयक सर्वाधिकार बँक व्यवस्थापनाकडे राखून ठेवत असून ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि ऑनलाईन स्वरूपाचे होणार आहे.