Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत गट क विभागामध्ये रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त असणारी पदे सरळसेवा पद्धतीने भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नाशिक महानगरपालिका अंतर्गत सरळसेवा विभागामध्ये नोकरीसाठी अर्ज हा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे, त्या वेबसाईटच्या आधारे उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Notification
नाशिक महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा पद्धतीने पुढील भरले जाणार आहेत ” सहाय्यक अभियंता ( विद्युत), सहाय्यक अभियंता ( स्थापत्य), सहाय्यक अभियंता ( यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता ( विद्युत), कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता ( वाहतूक), सहाय्यक कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), सहाय्यक कनिष्ठ अभियंता ( विद्युत) ही पदे जाणार आहेत. या पदासाठी एकूण 114 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
नाशिक महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना 10 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज सादर करायचा आहे.
तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अर्ज करणे बंधनकारक राहील. या नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Details
नाशिक महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याचे लिंक आणि अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन दिलेली आहे .
♦️पदाचे नाव व तपशील :
| अ . क्र. | पद | पदसंख्या |
| 1 | सहाय्यक अभियंता ( विद्युत) | 03 |
| 2 | सहाय्यक अभियंता (स्थापत्य ) | 15 |
| 3 | सहाय्यक अभियंता ( यांत्रिकी) | 04 |
| 4 | कनिष्ठ अभियंता ( विद्युत) | 07 |
| 5 | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) | 46 |
| 6 | कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी) | 09 |
| 7 | कनिष्ठ अभियंता ( वाहतूक) | 03 |
| 8 | सहाय्यक कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) | 24 |
| 9 | सहाय्यक कनिष्ठ अभियंता ( विद्युत) | 03 |
| Total | 114 |
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून स्थापत्य/ विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी या शाखेची पदवी किंवा पदविका असणे गरजेचे आहे.
- वरीलपैकी काही पदांसाठी अनुक्रमे 03 ते 05 अण्णाभाऊ असणे आवश्यक आहे.
- तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
- खुला प्रवर्ग/ अराखीव प्रवर्ग : 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.
- मागासवर्गीय अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ खेळाडू/ अनाथ/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक : 18 ते 43 वर्ष
- प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ दिव्यांग/ माजी सैनिक : 18 ते 45 वर्ष
- पदवीधर अंशकालीन उमेदवार : 18 ते 55 वर्ष
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : नाशिक महानगरपालिका
♦️वेतन (Salary) : पदानुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे
- पद क्रमांक 1, 2 व 3 : रु 41,800/- ते 1,32,300/- इतके प्रति महिना वेतन दिले जाईल.
- पद क्रमांक. 4,5,6,व 7 : रु,38,600/- ते रु,1.22.800 प्रति महिना
- पद क्रमांक 8 व 9 : रु. 29,200/- ते 92,300 दर महिना
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर 2025
- ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) : उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया पुढील टप्प्याने होईल
- अर्जाचे पडताळणी
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होईल
- गुणवत्तेनुसार गुणांची मोजणी केली जाईल
- कागदपत्रे पडताळणी
- अंतिम गुणवत्ता यादी
- वैद्यकीय तपासणी आणि नंतर नियुक्ती दिली जाईल
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे पुढील दिलेली सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
- शैक्षणिक कागदपत्रे (10 वी 12 वी / पदवी प्रमाणपत्र)
- जात प्रमाणपत्र( लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र
- अपंग/ अनाथ/ माजी सैनिक प्रमाणपत्र ( अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या प्रवर्गातून येत असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
- ईमेल आयडी व मोबाईल नंबर
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग/ अराखीव प्रवर्ग : रु. 1000/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती मागासवर्गीय/ अनाथ : 900/-
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
- तसेच विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- फोटो आणि सही अपलोड करा
- ऑनलाइन अर्ज शुल्क भरा व अर्ज सबमिट झाल्यानंतर प्रिंट काढून घ्या.