NHAI Bharti 2025 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नवीन पदांची नोकरी भरती! ऑनलाइन अर्ज पात्रता पाहा|

NHAI Bharti 2025

NHAI Bharti 2025 :भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत नवीन नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 84 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहेत.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ” डेप्युटी मॅनेजर ( वित्त आणि लेखा), लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन, जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, अकाउंटंट, स्टेनोग्राफर ” या पदांची पदभरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे, त्या वेबसाइटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

NHAI Bharti 2025 Notification

या भरतीसाठी उमेदवारांना 30 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्ण प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविण्यात येईल.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरती साठी उमेदवारांना सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे.

NHAI Bharti 2025 Details

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

  • डेप्युटी मॅनेजर ( वित्त आणि लेखा)
  • लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट
  • जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
  • अकाउंटंट
  • स्टेनोग्राफर

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : पदाचे नाव आणि पद संख्या पुढीलप्रमाणे

  • डेप्युटी मॅनेजर ( वित्त आणि लेखा) : 09
  • लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट : 01
  • जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर : 01
  • अकाउंटंट : 42
  • स्टेनोग्राफर : 31

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढीलप्रमाणे दिलेली आहे पदानुसार –

  • डेप्युटी मॅनेजर ( वित्त आणि लेखा) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए ( वित्त) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन – मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्स पदवी उत्तीर्ण असावा.
  • जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर : हिंदी/ इंग्रजी विषयासह मास्टर पदवी असणे आवश्यक. हिंदी इंग्रजी भाषांतराचा अनुभव किंवा प्रमाणपत्र असावे.
  • अकाउंटंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा सी.ए / सी . एम . ए .
  • स्टेनोग्राफर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. इंग्रजी/ हिंदी मधून 80 शब्द प्रतिमिनिट शॉर्ट हॅन्ड वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

♦️वयाची अट (Age Limit) : या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा पदानुसार पुढीलप्रमाणे दिलेली आहे.

  • पद क्रमांक 1 ते 4 साठी 18 ते 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 5 साठी 18 ते 28 वर्षापर्यंत
  • ओबीसी : 03 वर्षापर्यंत वयामध्ये सवलत
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
  • दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षापर्यंत सूट.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) :

  • डेप्युटी मॅनेजर ( वित्त आणि लेखा) : रु. 56,100/-ते रु 1,77,500/-
  • लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन व ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर : रु. 35,400 ते रु,1,12,400/-
  • अकाउंटंट : रु.29,200/-ते रु. 92,300/-
  • स्टेनोग्राफर : रु. 25,500/- ते रु. 81,100/-

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • अर्ज करण्याची तारीख : 30 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2025

♦️निवड प्रक्रिया :

  • ऑनलाइन संगणक प्रणाली परीक्षा (CBT)
  • मुलाखत
  • कौशल्य चाचणी

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढे दिलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे

  • शैक्षणिक कागदपत्रे (10 वी , 12 वी प्रमाणपत्रे पदवी प्रमाणपत्र).
  • जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही.

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 फी असेल.
  • अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग यांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा फी नाही.

NHAI Bharti 2025 Online Apply

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी .
  • अधिकृत वेबसाईट वरती गेल्यावर अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करावे.
  • नोंदणी करून लॉगिन करावे.
  • आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • ऑनलाइन फी भरून फॉर्म सबमिट करावा.
  • ऑनलाइन फी भरल्याची पावती जतन करून ठेवावी.