PDCC Bank Bharti 2025 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पदांचे नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अंतर्गत लेखनिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नोकरी जाहिरात करण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लेखनिक पदाच्या एकूण 434 रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक पदाच्या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाइटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
PDCC Bank Bharti 2025 Notification
बँकेमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पुणे जिल्हा हद्दीमधील उमेदवारांना 70 टक्के राखीव जागा आहेत तसेच बाहेरील उमेदवारांना 30% जागा उपलब्ध आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अंतर्गत भरती 2025 ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 1 डिसेंबर 2025 पासून होईल. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा.
तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे. जा उमेदवारांना बँक नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चे स्थळ वापरून अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे. उमेदवारांनी वाचावे.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- लिपिक (लेखनिक)
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 434
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्या शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
- तसेच MS-CIT किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समक्ष संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 38 वर्षापर्यंत आहे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ मागासवर्गीय प्रवर्ग यांच्यासाठी वयामध्ये सूट दिलेली आहे कृपया अधिकृत जाहिरात तपासा.
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे जिल्हा
♦️वेतन (Salary) :
- या भरतीमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवाराला प्रतिमा यांना 20 हजार रुपये ते 25 हजार रुपये पर्यंत वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
- तसेच बँकेच्या नियमानुसार इतर आवश्यक भत्ते मिळणार आहेत.
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 1 डिसेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 डिसेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- ऑनलाइन लेखी परीक्षा (Online Written Exam)
- मुलाखत (Interview)
- कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- रहिवासी दाखला
- ओळखपत्र ( आधार कार्ड /पॅन कार्ड)
- शैक्षणिक कागदपत्रे ( दहावी मार्कशीट बारावी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र)
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
- इतर आवश्यक कागदपत्रे
PDCC Bank Bharti 2025 Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन
- ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी फार्मर मध्ये विचारलेले सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूकपणे भरणे.
- आवश्यक असलेले कागदपत्रे फोटो सही स्कॅन करून अपलोड करावी.
- अर्ज फी ऑनलाईन भरावी.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाचे पावती जतन करून ठेवा.