PNB Bharti 2025! पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी पदाच्या नवीन नोकरी भरती सुरू|पाहा संपूर्ण माहिती|

PNB Bharti 2025

PNB Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत नवीन पदांची नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून जाहिरात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत उमेदवारांना बँकेत नोकरी मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी पदाच्या एकूण 750 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी 135 जागा उपलब्ध करून दिली आहेत. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत होणाऱ्या अधिकारी पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे.

PNB Bharti 2025 Notification

पंजाब नॅशनल बँक मध्ये होणारी नोकरी भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 3 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2025 आहे.

इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

  • स्थानिक बँक अधिकारी

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :

  • 750

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून जेव्हा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

♦️वयाची अट (Age Limit) :

  • खुला प्रवर्ग/ अराखीव प्रवर्ग : 20 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा
  • ओबीसी : 03 वर्ष वयामध्ये सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / माजी सैनिक : या घटकातील उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षाचे सूट देण्यात आली आहे.
  • अपंग : 10 वर्षाचे सूट

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) :

  • पंजाब नॅशनल बँक अंतर्गत स्थानिक अधिकारी पदाच्या अंतिम निवडीनंतर निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना रु. 48,480/-ते 85,920 वेतन दिले जाणार आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे.
  • तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2025 आहे.

♦️निवड प्रक्रिया :

  • अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • ऑनलाइन अर्ज आणि दस्तऐवजाची पडताळणी केली जाईल.
  • स्थानिक भाषा चाचणी होणार आहे.
  • वैयक्तिक मुलाखत

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : पंजाब नॅशनल बँक मध्ये स्थानिक अधिकारी पदाच्या नोकरी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुढील दिलेले आहे . उमेदवारांनी दिलेली सर्व कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • जन्म दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे प्रवर्ग/ ओबीसी : रुपये 1180/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार : रुपये 59/-

PNB Bharti 2025 Apply Online

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करावा.
  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर रिक्रुटमेंट/ करियर या पर्यायावर क्लिक करून नवीन नोंदणी करून घ्यावी.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावेत.
  • अर्जाची फी ऑनलाईन भरून अर्ज सबमिट करावा.
  • ऑनलाइन अर्जाच्या पावतीची प्रिंट काढून घ्यावी .