Punjab and Sind Bank Bharti 2025| पंजाब अँड सिंध बँकेत नोकरीची संधी ! आजच करा ऑनलाइन पद्धतीने अर्ज |

Punjab and Sind Bank Bharti 2025

Punjab and Sind Bank Recruitment 2025 : पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत नवीन नोकरी भरती अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत रिक्त असणाऱ्या पदांचे पद भरती करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत क्रेडिट मॅनेजर, एग्रीकल्चर मॅनेजर या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

कॅनरा बँकेत 35000 जागांची मेगा भरती येथे क्लिक करा
इंडियन बँक अंतर्गत नवीन नोकरी भरती येथे क्लिक करा

Punjab and Sind Bank Bharti Notification

पंजाब अँड सिंध बँक मध्ये एकूण 190 जागांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत . या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधी वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे.

Punjab and Sind Bank Bharti Details

पंजाब अँड सिंध बँक मध्ये होणाऱ्या 190 रिक्त जागांसाठी उमेदवारांना आवश्यक असणारी सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

यामध्ये पदाचे नाव, पदांची संख्या, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, मिळणारे वेतन, ऑनलाइन अर्ज कसा करायचा या सर्व बाबींची माहिती खालीलप्रमाणे –

पदाचे नाव (Name of the Posts ) : पंजाब अँड सिंध बँक मध्ये पुढील पदाची भरती होणार आहे.

  • क्रेडिट मॅनेजर
  • एग्रीकल्चर मॅनेजर

एकूण पदे (Total Posts) : या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 190 रिक्त असणारी पदे भरली जाणार आहेत.

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –

1. क्रेडिट मॅनेजर :

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • किमान 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे

2. एग्रीकल्चर मॅनेजर :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बी. एससी पदवी असावी ( कृषीशास्त्र, उद्यान विद्या, दुग्धव्यवसाय, प्राणी पालन, वनीकरण, पशुवैद्यक शास्त्र, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, मत्स्य शास्त्र) या विषयातील पदवी उत्तीर्ण असावी.
  • किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

वयाची अट (Age Limit) : पंजाब अँड सिंध बँक मध्ये उमेदवारांचे वयोमर्यादा –

1. खुला प्रवर्ग : किमान 23 वर्षे ते कमाल 35 वर्षापर्यंत असावा.

  • ओबीसी : 03 वर्ष सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षापर्यंत सूट.
  • अपंग : 10 वर्षाची सूट

नोकरी ठिकाण (Job Location) : या भरतीमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामधील कोणत्याही शाखेमध्ये निवड केली जाईल.

वेतन (Salary) : पंजाब अँड सिंध बँक मध्ये उमेदवारांना पुढील प्रमाणे वेतन असेल – मॅनेजर एम. एम् . जी II रु 64,820 ते 93,960 आणि इतर भत्ते दिले जाणार आहेत.

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा (Important Dates ) :

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2025
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 ऑक्टोंबर 2025
  • परीक्षा : या भरती साठी परीक्षा तारीख निश्चित केलेली नाही. ( लवकरच वेबसाईटच्या माध्यमातून कळवण्यात येईल).

निवड प्रक्रिया : पंजाब अँड सिंध बँक मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड ही तीन टप्प्यामध्ये होणार आहे.

  • उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल .
  • मुलाखत मुलाखत
  • तसेच अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षा 70% गुण आणि मुलाखत 30% गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. दिलेली सर्व कागदपत्रे उमेदवारांनी जवळ बाळगावी. कोणतीही डुबलीकेट आणि fraud नसावीत .

  • जन्माचा दाखला
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व 10 मार्कशीट, 12 मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला ( उमेदवार प्रवर्गातून येत असल्यास)
  • EWS उमेदवारांसाठी (EWS प्रमाणपत्र)
  • अपंग उमेदवारांसाठी PwBD प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन/ ओळखपत्र
  • सही आणि फोटो.

अर्ज शुल्क : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पुढील प्रमाणे अर्ज शुल्क आकारले आहे.

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी / आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील उमेदवारांना रु 850/- आणि लागू असलेले पेमेंट गेटवे फी भरावी .
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग पाटील उमेदवारांना रु 100/- आणि पेमेंट गेटवे शुल्क राहील.
  • उमेदवारांनी भरलेले परीक्षा शुल्क हे कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.

Punjab and Sind Bank Bharti Online Apply

ऑनलाइन अर्ज कसा करावा –

पंजाब अँड सिंध बँक मध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पुढील दिलेल्या स्टेप प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

  • या भरती प्रक्रियेसाठी संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना वरती अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
  • अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन उमेदवाराने आवश्यक असलेली सर्व माहिती भरून विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ध शुल्क भरावे.
  • अपूर्ण असलेले अर्ज आणि अर्ज शुल्क न भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे.
  • उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.