Punjab National Bank Bharti 2026! पंजाब नॅशनल बँकेत 5138 अप्रेंटिस पदाची नोकरी भरती सुरू; असा करा ऑनलाइन अर्ज|

Punjab National Bank Bharti 2026 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत नवीन पदांची नोकरी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 5138 जागांची नोकरी भरती केली जाणार आहे. त्या भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवार ( अप्रेंटिस) या पदाची भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

Punjab National Bank Bharti 2026 Details

बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी लोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक मध्ये ऑनलाइन अर्ज सुरुवात 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी अर्ज करावा. तसेच या भरतीसाठी करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे , ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखेला अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Punjab National Bank Bharti 2026 Notification

पंजाब नॅशनल बँक मध्ये शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक दिलेली आहे. तसेच जाहिरात लिंक दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • अप्रेंटिस

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 5138

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पण काही म्हणण्याचा फक्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक – उमेदवार हा ज्या राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून अर्ज करत आहे. त्याला तेथील स्थानिक भाषा येणे अनिवार्य आहे.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • किमान वय : 20 वर्षापर्यंत असावे
  • कमाल वय : 28 वर्षे असावे
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : या प्रवर्गासाठी वयामध्ये 05 वर्षाचे सूट
  • ओबीसी : 03 वर्षाची सूट
  • दिव्यांग : 10 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी कायमस्वरूपी नोकरी नसून एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी आहे.
  • या कालावधीदरम्यान उमेदवारांना 12,300/- ते 15,000/- इतके दिले जाणार आहे

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 8 फेब्रुवारी 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांचे चार टप्प्यांच्या आधारे निवड केली जाईल
  • ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल
  • कागदपत्रे पडताळणी
  • स्थानिक भाषा चाचणी
  • वैद्यकीय तपासणी

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे आकारले आहे.
  • सामान्य/ ओबीसी/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे घटक पुरुष : 944/-
  • सामान्य/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक महिला : 708
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अपंग उमेदवार ( पुरुष/ महिला) : 236/-
  • तृतीयपंथी : 236/-
Punjab National Bank Bharti 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावे.
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर नोंदणी करून घ्यावे.
  • अप्रेंटिस एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक करून आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा प्रिंट काढून घ्या.
  • याशिवाय उमेदवाराने NAPS किंवा NATS जास्त संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यापूर्वी कोठेही शिकाऊ उमेदवार केलेली नसावी.
  • एका वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले पदवीधर उमेदवार यासाठी पात्र नाहीत.
  • ही नोकरी नसून केवळ एक प्रशिक्षण आहे.
  • प्रशिक्षण संपल्यानंतर बँकेत नोकरी मिळवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उमेदवाराला नाही.