RBI Assistant Bharti 2026 :नमस्कार मित्रांनो, बँकेमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या उमेदवारांना भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये नोकरीची भरती झाली आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील असलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे.
भारतीय रिझर्व बँक मध्ये असिस्टंट पदाच्या एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी संधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 650 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामधील मुंबईसाठी 249 आणि नागपूर साठी 17 जागा आहेत.
RBI Assistant Recruitment 2026
भारतीय रिझर्व बँक मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट चा वापर करून अर्ज सादर करायचा आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2026 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करावा.
तसेच या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा घेतली जाईल . मेरिटच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना आवश्यक असणारी सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे, उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचा.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- असिस्टंट
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 650
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवारा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला संगणकीय ज्ञान असावे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- उमेदवाराचे किमान वय हे 20 वर्षे पूर्ण आणि कमाल वय 28 वर्षापर्यंत असावे.
- ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट दिली आहे
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- अपंग उमेदवारांना 10 वर्षाची सवलत वयामध्ये दिली आहे.
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- संपूर्ण भारत
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- उमेदवारांना सुरुवातीचा मूळ पगार हा 29000/- रुपये आहे. एकूण मासिक वेतन आणि सर्व भक्तांस साधारणपणे उमेदवाराला 58,514 /- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
- तसेच राहण्यासाठी घर, वैद्यकीय सुविधा, रजा सवलत यासारख्या सुविधा मिळणार आहेत.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 16 फेब्रुवारी 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 मार्च 2026
- परीक्षा फी भरण्याची मुदत : 16 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026
- पूर्व परीक्षा ; 11 एप्रिल 2026
- मुख्य परीक्षा : 7 जून 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- भाषा प्रवीण चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
- शैक्षणिक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- डोमासाईल
- जन्म दाखला
- ओळखपत्र
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 450+18%GST इतके अर्ज शुल्क आहे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार/ माजी सैनिक या उमेदवारांना ₹50 + 18% GST एवढे अर्ज शुल्क आहे.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
RBI Assistant Recruitment 2026 Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरून करायचा आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर Current Vacancies मध्ये जाऊन Recruitment for the Post of Assistant या लिंक वर क्लिक करावे.
- नवीन नोंदणी करून आपले नाव व संपर्क क्रमांक टाकून ईमेल आयडी भरावा.
- फार्म मध्ये सर्व माहिती अचूक भरावी.
- फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावी.
- सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये होणारी भरती ही पदवीधर उमेदवारांच्या साठी आहे.
- कोणत्याही शाखेच्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
- फक्त अधिकृत वेबसाईट वरूनच अर्ज करावा.
- एका उमेदवाराने एकदाच अर्ज करावा.
- बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या उमेदवारांना ही एक चांगली संधी आहे.
- शेवटची तारीख 8 मार्च 2026 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता अगोदर अर्ज करावा.