RRB NTPC Bharti 2025! भारतीय रेल्वेत 8000+ जागांची नोकरी 12 वी , पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पाहा संपूर्ण माहिती|

RRB NTPC Recruitment 2025

RRB NTPC Bharti 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या पद भरतीसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली असून भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या पद भरतीला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 8875 पदांची मेगा भरती होणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज सादर करावा.

RRB NTPC Recruitment Notification

भारतीय रेल्वे अंतर्गत रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली असून, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली उपलब्ध करून दिली आहे, त्या वेबसाइटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.

भारतीय रेल्वे अंतर्गत 12 वी उत्तीर्ण तसेच पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट या दोन विभागातून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अंडर ग्रॅज्युएट पदासाठी 21 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करण्यात सुरुवात होईल. तसेच पदासाठी 28 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल.

भारतीय रेल्वे अंतर्गत ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सविस्तरपणे खालील माहिती दिलेली आहे. संबंधित उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच जाहिरात नोटिफिकेशन पहावे.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर161
2स्टेशन मास्टर615
3गुड्स ट्रेन मॅनेजर3423
4ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट921
5सीनियर क्लर्क ( लिपिक) कम टायपिस्ट638
6कमर्शियल कम तिकीट क्लर्क ( लिपिक)2424
7अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट394
8जूनियर क्लर्क कम टायपिस्ट163
9 ट्रेन्स क्लर्क ( लिपिक)77
Total8875

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :भारतीय रेल्वे अंतर्गत एकूण 8875 जागांची मेगा भरती होणार आहे.

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पुढीलप्रमाणे पदानुसार दिली आहे –

  1. पद क्रमांक 1 : पदवीधर
  2. पद क्रमांक 2 : पदवीधर
  3. पद क्रमांक 3 : पदवीधर
  4. पद क्रमांक 4 : पदवीधर , संगणकावर इंग्रजी/ हिंदीमध्ये टायपिंग प्रवीण ता असणे आवश्यक आहे.
  5. पद क्रमांक 5 : पदवीधर , संगणकावर/ इंग्रजी /हिंदी मध्ये टायपिंग मध्ये प्रवीणता आवश्यक.
  6. पद क्रमांक 6 : 50% गुणांचा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  7. पद क्रमांक 7 : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावे, संगणकावर इंग्रजी/ हिंदी टायपिंग.
  8. पद क्रमांक 8 : 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावे , संगणकावर इंग्रजी/ हिंदी टायपिंग असणे आवश्यक आहे.
  9. पद क्रमांक 9 : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

♦️वयाची अट (Age Limit) : या भरतीसाठी उमेदवारांचे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे दिलेले आहे.

  • 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 33 वर्षापर्यंत असावे.
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • ओबीसी : 03 वर्षाची सूट
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (Undergraduate)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (Graduate)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : या भरतीमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना भारतीय रेल्वे अंतर्गत कोणत्याही विभागामध्ये पोस्टिंग दिली जाईल.

♦️वेतन (Salary) :

  • या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना रु,35,400/- इतके प्रती महिना वेतन दिले जाईल.

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 15 सप्टेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2025
  • अर्ज शुल्क भरण्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2025
  • अर्ज दुरुस्त करण्याची तारीख : 17 ते 26 ऑक्टोबर 2025.

♦️निवड प्रक्रिया :

  • या भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • संगणकीय चाचणी
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • आधार कार्ड/ वैद्य ओळखपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 10वी , पदवी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र लागू असल्यास
  • रहिवासी दाखला
  • जन्म दाखला
  • PwBD प्रमाणपत्र लागू असल्यास
  • माजी सैनिक प्रमाणपत्र लागू असल्यास

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 आहे.
  • या प्रवर्गातील उमेदवार लेखी परीक्षेला हजर राहिल्यास रुपये 400 रुपये परत मिळणार आहेत.
  • मागासवर्गीय/ महिला/ ट्रांसजेंडर/ माजी सैनिक/ आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्ग/ अल्पसंख्याक/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये फी भरावी लागेल.
  • लेखी परीक्षेला हजर राहिल्यास उमेदवाराला 250 रुपये परत मिळणार आहेत.

RRB NTPC Recruitment 2025 Apply Online

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरती जाऊन लॉगिन करावे.
  • ऑनलाइन फॉर्म मध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती भरावी.
  • तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • फोटो आणि सही अपलोड करावी
  • अर्ज शुल्क ऑनलाईन भरून फॉर्म सबमिट करावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.