RBI Grade B Bharti 2025
RBI Grade B Recruitment 2025 :भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत नवीन पदांची नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिझर्व बँक अंतर्गत रिक्त असणाऱ्या पदांचे पद भरती करण्यासाठी भरतीचे जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँक मध्ये ऑफिसर ग्रेड बी , जनरल ऑफिसर ग्रेड बी ( डी. आर) डी. ई. पी. आर, ऑफिसर ग्रेड बी ( डी आर) डी.एस. आय. एम या पदांची भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.
भारतीय रिझर्व बँक मध्ये एकूण 120 रिक्त जागांची पद भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करणे बंधनकारक राहील.
RBI Bharti Notification
या भरती प्रक्रियेसाठी 10 सप्टेंबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावे. भारतीय रिझर्व बँक अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आलेली आहे.
भारतीय रिझर्व बँक अंतर्गत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा.
भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असणारी सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे . उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पुढे दिलेली आहे . त्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
पदाचे नाव (Name of the Posts ) :
भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत पुढील पदांची पद भरती होणार आहे
- ऑफिसर ग्रेड बी (डी. आर) जनरल
- ऑफिसर ग्रेड बी ( डी.आर) डी ई पी आर
- ऑफिसर ग्रेड बी ( डी.आर) डी. एस. आय .एम
एकूण पदसंख्या (Total Posts) : या भरती मध्ये एकूण 120 पदांची पद भरती होणार आहे.
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पदानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे दिलेले आहे –
1. पद क्र, 1 : ऑफिसर ग्रेड बी (डी. आर ) जनरल :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. पद क्र . 2 : ऑफिसर ग्रेड बी (डी. आर) . डी ई. पी. आर :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातूनM.A/ M.sc/ ( Economic/ Finance/ quantitative Economics/ Statistic/ Mathematics/ data science/ Business Economics) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3.पद क्र. 3 : ऑफिसर ग्रेड बी ( डी.आर) डी. एस. आय .एम :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातूनM.A/ M.sc/ (AL / ML Mathematics/ Big Data science/ Business Economics) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट (Age Limit) :
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असावे. कमाल 30 वर्षापर्यंत असावे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती त्यांच्यासाठी 05 वर्षाचे वयामध्ये शिथिलता दिलेली आहे.
- ओबीसी (OBC) : 03 वर्षाची सूट
- अपंग असणाऱ्या उमेदवारांना 10 वर्षापर्यंत सूट दिलेली आहे.
नोकरी ठिकाण (Job Location) : भारत रिझर्व बँक ऑफ इंडिया.
वेतन (Salary) :
भारतीय रिझर्व बँक RBI Grade B मध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रमाणे मासिक वेतन श्रेणी दिले जाणार आहे .
- रु.78,450/- ते 1,50,000/- प्रति महिना
- तसेच अतिरिक्त सुविधा
- निवास सुविधा
- वैद्यकीय
- गाडी/ घर/ शैक्षणिक कर्ज/
- सुट्टी व प्रवास भत्ता
- नवीन पेन्शन योजना
RBI Bharti 2025 Details
महत्त्वाच्या तारखा (Important Dates ) :
- ऑनलाइन अर्ज करणे ची सुरुवात 10 सप्टेंबर 2025 पासून
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत
निवड प्रक्रिया :
रिझर्व बँक अंतर्गत आरबीआय ग्रेड बी पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे . यामध्ये प्रीलीम ऑनलाइन पद्धतीने ऑब्जेक्टिव परीक्षा होणार आहे 200 गुणांसाठी.
प्रीलीम परीक्षेमधून उत्तीर्ण होणारे उमेदवारांना मेन्स परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स 300 गुणांसाठी असतील.
मुलाखत 50 गुणांची आहे.
महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पुढील कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
- पासपोर्ट साईज फोटो, सही, अंगठ्याचा ठसा
- ओळखपत्र ( आधार कार्ड/ पासपोर्ट/ पॅन कार्ड/ वोटर आयडी) यापैकी कोणताही एक पुरावा असावा.
- जन्मतारखेचा पुरावा
- शैक्षणिक कागदपत्रे ( डिग्री सर्टिफिकेट/ पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट)
- जातीचा दाखला /EWS/PwBD प्रमाणपत्र ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्यांच्याजवळ असावे.
- अनुभव प्रमाणपत्र
- नोकरदार उमेदवारांसाठी NOC
अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 850/-18% GST फी भरावी लागेल.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 100 आणि 18% GST अशी फी भरावी लागणार आहे.
- आर. बी. आय. कर्मचारी : यांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
RBI Bharti Online Apply
ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती लॉगिन करावे.
- ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरावा.
- शैक्षणिक माहिती. वैयक्तिक तपशील भरून आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट कॉफी जतन करून ठेवावी.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दिलेल्या वेळेमध्ये भरावा.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
- उशिरा आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.