SBI Recruitment भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर पदाच्या 0996 जागांची मेगा भरती जाहीर ! बँकेत नोकरीची संधी|

SBI Recruitment 2025

SBI Recruitment :भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांच्या पद भरतीसाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 0996 रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. ज्या उमेदवारांना बँकेमध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

SBI Recruitment 2025

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पुढील पदांची भरती केली जाणार आहे.

  • VP वेल्थ (SRM)
  • AVP वेल्थ (RM)
  • कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :

  • VP वेल्थ (SRM) : 506
  • AVP वेल्थ (RM) : 206
  • कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह : 284

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : त्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार पुढील प्रमाणे –

  • पद क्रमांक 1 : पदवीधर असणे आवश्यक आहे , 06 वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्रमांक 2 : पदवीधर असणे आवश्यक आहे, 04 वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्रमांक 3 : पदवीधर

♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे

  • 1 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय हे पदानुसार
  • पद क्रमांक 1 : 26 ते 42 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 2 : 23 ते 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 3 : 20 ते 35 वर्षापर्यंत
  • ओबीसी : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी वयामध्ये 05 वर्षाची सवलत दिली आहे.

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

SBI Recruitment 2025 Official Website

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 आहे.

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :

  • उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षा च्या माध्यमातून होणार आहे.
  • वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल
  • कागदपत्रे पडताळणी

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( 10वी 12वी मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र)
  • फोटो आणि सही
  • रहिवासी दाखला
  • जन्मतारखेचा दाखला
  • जातीचा दाखला
  • EWS प्रमाणपत्र

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ EWS प्रवर्ग/ ओबीसी : रु. 750/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवार यांच्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही

SBI Recruitment 2025 Apply Online

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाइटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणी केल्यानंतर फार्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • फोटो आणि सही अपलोड करा.
  • अर्जाची फी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरा.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
  • प्रिंट काढून द्या