SBI SCO Recruitment भारतीय स्टेट बँकेत नवीन पदांची नोकरी भरती सुरू! पदवीधर अर्ज करण्यास पात्र |

SBI Recruitment 2025

SBI Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत नवीन पदाचे पद भरती करण्यासाठी नोकरी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले असून, बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांच्या पद भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे.

भारतीय स्टेट बँक अंतर्गत एकूण 103 रिक्त जागांच्या पदासाठी पद भरती करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

भारतीय स्टेट बँक अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करणे बंधनकारक राहील. ऑनलाइन अर्ज करण्याचे तारीख 17 नोव्हेंबर 2025 आहे.

बँक मध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी वेळ वाया घालवतात तात्काळ अर्ज सादर करावा.

SBI Recruitment 2025 Notification

भारतीय स्टेट बँक अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरती साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे.

♦️पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 हेड (Product, Investment & Research)01
2 झोनल हेड (Retail)04
3 रिजनल हेड 07
4 रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीडर 19
5 इन्वेस्टमेंट स्पेशालिस्ट (IS)22
6 इन्वेस्टमेंट ऑफिसर (IO)46
7 प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (Business )02
8 सेंट्रल रिसर्च टीम (Support )02
Total 103

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : 103

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

1. पद क्रमांक 1 : i) पदवी/ पदव्युत्तर पदवी 15 वर्षाचा अनुभव

2, पद क्रमांक 2 : पदवीधर , 15 वर्षे अनुभव

3 . पद क्रमांक 3 : पदवीधर. 12 वर्षाचा अनुभव

4. पद क्रमांक 4 : पदवीधर , 08 वर्षाचा अनुभव

5. पद क्रमांक 5 : PG पदवी/ PG डिप्लोमा ( फायनान्स/ अकाउंटन्सी/ बिझनेस मॅनेजमेंट/ कॉमर्स/ इकॉनॉमिक्स/ कॅपिटल मार्केट्स/ बँकिंग/ इन्शुरन्स/) किंवा CA / CFA , ii) 06 वर्षे अनुभव

6. पद क्रमांक 6 : PG पदवी/ PG डिप्लोमा ( फायनान्स/ अकाउंटन्सी/ बिझनेस मॅनेजमेंट/कॉमर्स/ इकॉनॉमिक्स/ कॅपिटल मार्केट्स/ बँकिंग/ इन्शुरन्स).

7 . पद क्रमांक 7 : MBA/ PGDM , ii) 05 वर्षाचा अनुभव.

8. पद क्रमांक 8 : पदवी ( कॉमर्स/ फायनान्स/इकॉनॉमिक्स/ मॅनेजमेंट/ मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक) , 03 वर्षाचा अनुभव.

♦️वयाची अट (Age Limit) : 31 मे 2025 रोजी

  • पद क्रमांक 1 ते 3 : 35 ते 50 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 4 ते 6 : 28 ते 42 वर्षे
  • पद क्रमांक 7 : 30 ते 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 8 : 25 ते 35 वर्षापर्यंत
  • अनुसूचित जाती जमाती : 05 वर्षाची सूट, ओबीसी : 03 वर्षाची सूट

SBI Recruitment 2025 Official Website

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : पूर्ण भारतामधील भारतीय स्टेट बँक शाखा मध्ये कुठेही पोस्टिंग दिली जाईल

♦️वेतन (Salary) :

  • भारतीय स्टेट बँक अंतर्गत अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार वेतनश्रेणी दिली जाईल, ₹64,820 to over ₹1,00,000

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात 28 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025.

♦️निवड प्रक्रिया :

  • एसबीआय SCO (Specialist Cadre Officer) निवड प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने मुलाखत घेतली जाते, परंतु काही पदांसाठी या प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा  किंवा दोन्हीचा समावेश असू शकतो.

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • मुलाखत: बहुतांश पदांसाठी, मुलाखत हा निवड प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
  • ऑनलाइन परीक्षा : काही विशिष्ट पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाऊ शकते, त्यानंतर मुलाखत होते.
  • एकत्रित निवड: काही पदांसाठी, मुलाखत आणि/किंवा ऑनलाइन परीक्षा या दोन्हीचा एकत्रित विचार करून निवड केली जाते. 

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील कागद पत्रे जवळ असणे गरजेचे आहे.

  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/पॅन कार्ड/) यापैकी कोणताही एक पुरावा
  • जन्मतारखेचा पुरावा
  • शैक्षणिक कागदपत्रे ( पदवी प्रमाणपत्र / PG प्रमाण पत्र )
  • जातीचा दाखला (लागू असल्यास )
  • EWS प्रमाण पत्र (लागू असल्यास )
  • अनुभव प्रमाण पत्र

♦️अर्ज शुल्क (Application Fees) : भारतीय स्टेट बँक अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग/ EWS/OBC : रु 750/- (SC/ST/PWD : फी नाही )

SBI Recruitment 2025 Apply Online

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • ऑनलाइन नोंदणी करून लॉगिन करावे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.