SEBI Bharti 2025|सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये नोकरी भरती जाहीर ! मोठ्या पगारची नोकरी |

SEBI Vacancy 2025

SEBI Bharti 2025 :सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांची नोकरी भरती जाहीर झाली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ऑफिसर ग्रेड ए (असिस्टंट मॅनेजर) हे पद भरले जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.

SEBI Bharti 2025 Notification

या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2025 आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. शेवटच्या तारखेनंतर आलेले कोणत्याही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SEBI Bharti 2025 Details

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर ग्रेट ए असिस्टंट मॅनेजर या पदाच्या पद भरतीसाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. आवश्यक असणारी कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) : गट व पदसंख्या –

अ . क्र. गट पदसंख्या
1सामान्य56
2कायदेशीर20
3माहिती तंत्रज्ञान22
4संशोधन04
5अधिकृत भाषा03
6विद्युत अभियांत्रिकी02
7स्थापत्य अभियांत्रिकी04
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्या देशातील पदव्युत्तर पदवी/ कायदा/ अभियांत्रिकी पदवी किंवा CA/CFA/CS/Cost अकाउंटंट
  • कायद्यातील पदवी (LLB) 2 वर्षे वकील म्हणून अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य
  • अभियांत्रिकी पदवी ( कोणत्याही शाखेतील) किंवा संगणक विज्ञानातील पदव्युत्तर पदवी.
  • अर्थशास्त्र/ वाणिज्य/ फायनान्स/ स्टॅटिस्टिक्स/ डेटा सायन्स/ बिझनेस एनालिटिकल पदव्युत्तर पदवी
  • हिंदी/ इंग्रजी/ संस्कृत/ वाणिज्य/ अर्थशास्त्र विषयाचा हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी व संबंधित अनुभवास प्राधान्य असेल.
  • सिविल अभियांत्रिकी पदवी व बांधकाम प्रकल्प अनुभवास प्राधान्य

♦️वयाची अट (Age Limit) :

  • खुला प्रवर्ग : 18 ते 30 वर्षापर्यंत वय वर्ष
  • ओबीसी : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी वयामध्ये 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
  • अपंग उमेदवाराला वयामध्ये 10 वर्षाची सूट दिलेली आहे.

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) :

  • ऑफिसर ग्रेड ए ( असिस्टंट मॅनेजर) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला रु.62,100/- ते रु.1,26,100/- इतके प्रति महिना वेतन दिले जाईल.
  • तसेच इतर सुविधेमध्ये NPS योगदान, वैद्यकीय सुविधा, शिक्षण भत्ता इत्यादी

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • अर्ज करण्याची तारीख : 30 ऑक्टोबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 नोव्हेंबर 2025

♦️निवड प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे होईल.

  • प्राथमिक ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल
  • मुख्य ऑनलाईन परीक्षा
  • मुलाखत

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • शैक्षणिक कागदपत्रे (10 वी , 12 वी पदवी प्रमाणपत्र)
  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन/ वोटरआयडी) यापैकी कोणतेही एक.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
  • स्कॅन केलेली कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • सेवा व अनुभव प्रमाणपत्र

♦️अर्ज शुल्क (Application Fees) : सिक्युरिटीज अँड चेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी भरतीसाठी उमेदवारांना पुढील प्रमाणे अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग / ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 1000/- + GST.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / दिव्यांग रु, 100/- +GST

SEBI Recruitment 2025 Online Apply

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन
  • Careers Apply Online या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्यानंतर आवश्यक असणारी सर्व माहिती भरावी.
  • फोटो ,सही अंगठ्याचा ठसा व हॅन्ड रायटिंग डिक्लेरेशन अपलोड करणे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करावा.