SSC CPO Bharti 2025
SSC CPO Recruitment 2025 :स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पुरुष , पोलीस उपनिरीक्षक महिला, CAPF मधील उपनिरीक्षक (GD) या पदांची पद भरती करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे . स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 3073 जागांसाठी नोकरी भरती सुरू आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
या भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्यास 26 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 आहे. इच्छुक असणारे उमेदवाराने शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
SSC CPO Bharti 2025 Notification
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या दिल्ली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा ही नोव्हेंबर /डिसेंबर या कालावधीमध्ये पडली जाणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे.
SSC Recruitment 2025
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
या भरतीमध्ये पुढील पदे भरली जाणार आहेत.
- दिल्ली पोलीस उपनिरीक्षक पुरुष : 142 जागा
- दिल्ली पोलीस उपनिरीक्षक महिला : 70 जागा
- CAPF मधील उपनिरीक्षक (GD) : 2861
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस विभाग आणि CAPF उपनिरीक्षक (GD) या पदांसाठी एकूण 3073 जागा भरायचे आहेत.
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या भरती प्रक्रियेसाठी अर्जदार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून केव्हा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असावा (B.A/B.com/)
♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
- खुला प्रवर्ग 1 ऑगस्ट 2025 पर्यंत उमेदवाराचे वय हे 20 ते 25 वर्षापर्यंत असावे.
- ओ.बी.सी (O.B.C) : या प्रवर्गासाठी वयामध्ये 03 वर्षाची सूट.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागास (SC/ST) : 05 वर्षाची सूट.
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना दिल्ली पोलीस विभागामध्ये पोस्टिंग दिली जाणार आहे.
♦️वेतन (Salary) :
- दिल्ली पोलीस विभागामध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना रुपये 35,400/- ते 1,12,400/- इतके दरमहा पगार दिला जाणार आहे.
- तसेच इतर आवश्यक असणारे भत्ते सुद्धा मिळणार आहेत.
♦️महत्त्वाच्या तारखा (Important Dates ) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 26 सप्टेंबर 2025 पासून
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची तारीख 17 ऑक्टोबर 2025.
- ऑनलाइन परीक्षा (Computer Based) नोव्हेंबर- डिसेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया : उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया ही पुढील टप्प्यात प्रमाणे होईल –
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
- ऑनलाइन परीक्षेमद्धे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवार यांची कागद पत्रे पडताळणी (Document Verification )होईल.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरती साठी आवश्यक कागद पत्रे खालील प्रमाणे –
- ओळख पत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/)
- शैक्षणिक कागद पत्रे (10 वी , 12 वी पदवी उत्तीर्ण सर्टिफिकेट)
- पासपोर्ट साईज फोटो, सही.
- जातीचा दाखला (लागू असल्यास )
- EWS प्रमाण पत्र (लागू असल्यास )
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग (General)/ ओबीसी (OBC) : रु 100/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागास (SC/ST) कोणतीही फी नाही.
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
SSC Recruitment 2025 Apply Online
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वरती दिली आहे.
- त्या वेबसाइट वरती जाऊन लॉगिन करावे .
- ऑनलाइन अर्जा मध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती भरावी.
- विचारलेली कागद पत्रे अपलोड करावीत.
- फोटो आणि सही अपलोड करावी.
- ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे.
- सर्व माहिती बरोबर आहे का ती पाहून सबमिट वरती क्लिक करावे.
- अर्ज सबमिट झाल्या नंतर फी भरलेली पावती जातं करून ठेवा.
- उमेदवार यांनी ऑनलाइन अर्ज दिलेल्या वेळेत भरावा.