SSC GD Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत नवीन पदांची नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ” कॉन्स्टेबल ( जी . डी ) हे पद भरले जाणार आहे.
10 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल विभागामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सशस्त्र सीमा दल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, आसाम रायफल्स व सचिवालय सुरक्षा दल या विभागामध्ये नोकरीची भरती केली जाणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणारे कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. त्या वेबसाईट वरून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 1 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.
SSC GD Bharti 2025
तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणार आहे त्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेवर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे. तसेच अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
♦️पदाचे नाव व पदसंख्या तपशील
| अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सीमा सुरक्षा दल | 616 |
| 2 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल | 14595 |
| 3 | केंद्रीय राखीव पोलीस दल | 5490 |
| 4 | सशस्त्र सीमा दल | 1764 |
| 5 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस | 1293 |
| 6 | आसाम रायफल्स | 1706 |
| 7 | सचिवालय सुरक्षा दल | 23 |
| Total | 25,487 |
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 25,487
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
- खुला प्रवर्ग : 18 ते 23 वर्षापर्यंत
- ओबीसी प्रवर्गासाठी वयामध्ये 03 वर्षाचे सवलत दिलेली आहे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) :
- या भरती प्रक्रियेतून अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना रु. 21,700/- ते रु,69,100/- इतके प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 01 डिसेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 डिसेंबर 2025
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्या प्रमाणे केली जाणार आहे.
- उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल.
- शारीरिक मानक चाचणी
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी
- वैद्यकीय चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : या भरतीसाठी उमेदवारांकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे ( 10 वी उत्तीर्ण मार्कशीट)
- जात प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- फोटो आणि स्वाक्षरी
- मोबाईल नंबर व वैद्य ईमेल आयडी
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग जनरल रु. 100/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ माजी सैनिक या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
SSC GD Recruitment 2025 Online
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जदार उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- वेबसाईटला भेट दिल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करून फॉर्म भरावा.
- फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
- फोटो आणि सही अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
- अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट काढून घ्या.