MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 जागांसाठी भरती सरकारी नोकऱ्यांची सुवर्णसंधी; आजच ऑनलाइन अर्ज करा!

MPSC Group C Bharti 2026 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून जाहिरात प्रकाशित केली आहे. गट क अंतर्गत विविध रिक्त असणाऱ्या पदांची भरती केली जाणार आहे. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

MPSC मार्फत गट 2619 पदांची मोठी भरती होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट क विभागामध्ये लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक या पदांची भरती केली जाणार आहे.

MPSC Group C Recruitment 2026

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. सदर भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टल द्वारे अर्ज केलेले स्वीकारले जातील. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज 27 जून ते 13 जुलै या कालावधीत करायचा आहे तसेच ऑनलाइन पद्धतीने 17 जुलैपर्यंत अर्ज शुल्क भरायचे आहे.

MPSC Group C Notification 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याचे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचावी.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • उद्योग निरीक्षक
  • तांत्रिक सहाय्यक
  • कर सहाय्यक
  • सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क
  • लिपिक टंकलेखक

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • उद्योग निरीक्षक : 09
  • तांत्रिक सहाय्यक : 03
  • कर सहाय्यक : 282
  • सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क : 461
  • लिपिक टंकलेखक : 1864

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) पदानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

  • पद क्रमांक 1 : इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  • पद क्रमांक 2 : पदवीधर
  • पद क्रमांक 3 : पदवीधर, मराठी टंकलेखन , इंग्रजी टंकलेखन
  • पद क्रमांक 4 : 10 वी उत्तीर्ण ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
  • पद क्रमांक 5 : पदवीधर, मराठी टंकलेखन, इंग्रजी टंकलेखन

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 ऑक्टोबर 2026 रोजी
  • पद क्रमांक 1 : 19 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 2 : 19 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 3 : 19 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 4 : 19 ते 38 वर्षे
  • पद क्रमांक 5 : 19 ते 38 वर्षे
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अनाथ : 05 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा

MPSC Latest Recruitment 2026

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • उद्योग निरीक्षक : ₹35,400 – ₹1,12,400
  • तांत्रिक सहाय्यक : ₹29,200 – ₹92,300
  • कर सहाय्यक : ₹25,500 – ₹81,100
  • लिपिक टंकलेखक : ₹19,900 – ₹63,200

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 27 जून 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :  13 जुलै 2026
  • अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
  • प्रथम प्रीलिम्स परीक्षा होईल त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल.
  • मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मेरिट लिस्ट वरती निवड केली जाईल.
  • कागदपत्रे पडताळणी

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  •   खुला प्रवर्ग : 394/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अनाथ : 294/-
  • माजी सैनिक : 44/-

MPSC Group C Online Form 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी.
  • सर्व माहिती भरण्याचे खात्री करून ऊर्जा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2026 आहे.

MPSC Group C Bharti 2026 – 10 महत्त्वाचे FAQ

1) MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत किती पदांसाठी भरती होणार आहे?

या भरतीद्वारे एकूण 2619 गट-क पदे भरली जाणार आहेत.

2) MPSC Group C Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 जून 2026 पासून सुरू होणार आहे.

3) अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026 आहे.

4) MPSC Group C Bharti 2026 मध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे?

या भरतीमध्ये लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist), कर सहाय्यक (Tax Assistant), सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI), उद्योग निरीक्षक (Industry Inspector) आणि तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) या पदांचा समावेश आहे.

5) MPSC Group C Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. संबंधित पदासाठी आवश्यक पदवी, डिप्लोमा किंवा इतर पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

6) MPSC Group C Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया काय आहे?

उमेदवारांची निवड संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा (लागू असल्यास), कौशल्य चाचणी (संबंधित पदांसाठी), कागदपत्र पडताळणी आणि अंतिम गुणवत्ता यादी यांच्या आधारे केली जाईल.

7) MPSC Group C पूर्व परीक्षा कधी होणार आहे?

MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

8) MPSC Group C Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

9) MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये केली जाईल.

10) MPSC Group C Bharti 2026 ची अधिकृत अधिसूचना कुठे मिळेल?

अधिकृत अधिसूचना, ऑनलाइन अर्जाची लिंक आणि इतर सर्व माहिती MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.