NPCIL Apprentice Bharti 2026: 245 जागांसाठी मोठी भरती | ITI, Diploma उमेदवारांना संधी

NPCIL Apprentice Bharti 2026 : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 245 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होणार आहे.

मित्रांनो तुम्ही जर आयटीआय उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या नोकरी भरतीला सुरुवात झाली आहे.

NPCIL Apprentice Bharti 2026 Notification

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 26 फेब्रुवारी 2026 पासून झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2026 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ अर्ज सादर करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहावी.

Central Bank of India Bharti 2026येथे क्लिक करा
Janata Sahakari Bank Satara Bharti येथे क्लिक करा

♦️ पदाचे नाव & पदसंख्या :

👉ट्रेड अप्रेंटिस :

  1. फिटर : 68
  2. इलेक्ट्रिशियन : 68
  3. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 68
  4. COPA : 10
  5. टर्नर : 10
  6. मशिनिस्ट : 10
  7. वेल्डर : 11

NPCIL Apprentice Recruitment 2026 Eligibility

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उमेदवाराला ज्या ट्रेड साठी अर्ज करायचा आहे त्या ट्रेडमध्ये आयटीआय कोर्स पूर्ण झालेला असावा.
  • वेल्डर पदासाठी 8वी पास असणे आवश्यक आहे सोबत आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक

NPCIL Apprentice Bharti 2026 Official Website

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

NPCIL Apprentice Recruitment 2026 Age Limit

♦️ वयाची अट (Age Limit)

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे
  • कमाल वय 24 वर्षे
  • ओबीसी प्रवर्गासाठी वयामध्ये 03 वर्षाची सूट दिली आहे
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • अपंग उमेदवार : 10 वर्षाचे सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवारांचा कालावधी एक वर्षाचा असेल. या काळात उमेदवाराला दर महिना रुपये 9,600/- इतका स्टायपेंड म्हणून दिला जाईल.
  • त्याचा अनुभव मिळाल्यावर उमेदवाराला भारत सरकारकडून प्रमाणपत्र मिळेल. ते प्रमाणपत्र पुढे सरकारी नोकरांसाठी महत्त्वाचे असेल.

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 26 फेब्रुवारी 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 मार्च 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरतीसाठी कोणती लेखी परीक्षा नाही.
  • आय.टी.आय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल.
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)

  • ओळखपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र
  • फोटो
  • सही

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज पूर्णपणे निशुल्क करता येणार आहे.

NPCIL Apprentice Recruitment 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन APPRENTICESHIP India या पोर्टल वरती जाऊन स्वतःचे नोंदणी करून घ्या.
  • पोर्टल नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांनी NPCIL च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा.
  • नोंदणी केल्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
  • विचारलेले कागदपत्रे अपलोड करा

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी आयोजित केली आहे.
  • या भरतीमध्ये उमेदवाराला एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे.
  • ही भरती केवळ एक वर्षाचे प्रशिक्षण कालावधी आहे.
  • एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे कोणतेही बंधन संस्थेवर नाही.
  • आयटीआय झालेल्या उत्तीर्ण उमेदवारांना न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यासारख्या नामांकित केंद्र करण्याची एक संधी निर्माण झाली आहे.
  • या कंपनीमध्ये उमेदवाराने एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला सरकारी विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाईल.
  • त्या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवाराला भविष्यात कुठेही सरकारी विभागात नोकरीसाठी उपयोगी होईल.

NPCIL Apprentice Bharti 2026 – Important FAQ

1) NPCIL Apprentice Bharti 2026 काय आहे?

NPCIL Apprentice Bharti 2026 ही Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) मार्फत विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिस पदांसाठी घेतली जाणारी भरती प्रक्रिया आहे.

2) NPCIL Apprentice Bharti 2026 मध्ये कोणती पदे असतात?

या भरतीमध्ये सामान्यतः खालील अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले जातात:

  • Trade Apprentice
  • Diploma Apprentice
  • Graduate Apprentice

3) NPCIL Apprentice Bharti साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदानुसार पात्रता वेगवेगळी असते:

  • Trade Apprentice: 10वी + ITI (संबंधित ट्रेड)
  • Diploma Apprentice: Engineering Diploma
  • Graduate Apprentice: Engineering Degree

4) NPCIL Apprentice Bharti साठी वयोमर्यादा किती आहे?

साधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे.
आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

5) NPCIL Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी NPCIL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online अर्ज करावा.

6) NPCIL Apprentice Bharti साठी अर्ज शुल्क किती आहे?

बहुतेक वेळा Apprentice भरतीसाठी अर्ज शुल्क नसते, परंतु अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.

7) NPCIL Apprentice Bharti निवड प्रक्रिया काय आहे?

निवड प्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे असते:

  • Merit List (शैक्षणिक गुणांवर आधारित)
  • Document Verification

8) NPCIL Apprentice मध्ये स्टायपेंड किती मिळते?

अप्रेंटिस पदानुसार स्टायपेंड वेगळे असते. साधारणपणे ₹8,000 ते ₹15,000 प्रति महिना स्टायपेंड मिळू शकतो.

9) NPCIL Apprentice Bharti मध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असते?

निवड झालेल्या उमेदवारांना NPCIL च्या विविध प्रकल्पांमध्ये प्रशिक्षण दिले जाते, जसे की Tarapur Atomic Power Station, Kakrapar Atomic Power Station इत्यादी.