MMRDA Bharti 2026 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती करण्यासाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 235 रिक्त जागा भरण्यासाठी सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहेत.उमेदवाराला मुंबई महानगर प्रदेश विभागामध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळणार आहे
नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत गट -अ गट- ब आणि गट- क या संवर्गातील एकूण 235 जागा भरण्यासाठी नोकरी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
MMRDA Bharti 2026 Notification
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 18 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे. ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील लेखात दिलेले आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MMRDA Bharti 2026 Details Information
♦️ पदाचे नाव &पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | वर्ग | पदसंख्या |
| 1 | सहाय्यक अभियंता श्रेणी 1 ( स्थापत्य) | अ | 07 |
| 2 | सहाय्यक अभियंता श्रेणी 1 ( रेल पथ) | अ | 01 |
| 3 | सहाय्यक अभियंता श्रेणी 1 ( संकेत व दूरसंचार) | अ | 01 |
| 4 | उपनियोजक | अ | 29 |
| 5 | सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक | ब | 04 |
| 6 | सहाय्यक अभियंता श्रेणी -2 /कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) | ब | 82 |
| 7 | सहाय्यक अभियंता श्रेणी -2 / कनिष्ठ अभियंता ( रेल पथ) | ब | 04 |
| 8 | सहाय्यक अभियंता श्रेणी -2 / कनिष्ठ अभियंता ( विद्युत) | ब | 16 |
| 9 | सहाय्यक अभियंता श्रेणी 2 / कनिष्ठ अभियंता ( संकेत व दूरसंचार) | ब | 02 |
| 10 | सहाय्यक समाज अधिकारी विकास | ब | 07 |
| 11 | सहाय्यक विधी अधिकारी | ब | 04 |
| 12 | उद्यान विद्या सहाय्यक | ब | 02 |
| 13 | उपलेख पाल | क | 33 |
| 14 | लघु टंकलेखक | क | 10 |
| 15 | भूमापक | क | 31 |
| 16 | संगणक तंत्रज्ञान | क | 02 |
| Total | 235 |
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) शैक्षणिक पात्रता हे पदानुसार पुढीलप्रमाणे
- पद क्रमांक 1 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 05 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 2 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 3 : इलेक्ट्रॉनिक/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव.
- पद क्रमांक 4 : वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी असावी. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी.
- पद क्रमांक 5 : कोणत्याही शाखेतील पदवी MS-CIT आणि पाच वर्षाचा अनुभव.
- पद क्रमांक : 6 सिविल इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा + 02 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 7 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा + 02 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 8 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा + 02 वर्षाचा अनुभव.
- पद क्रमांक 9 : इलेक्ट्रॉनिक/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पदवी/ डिप्लोमा + 02 वर्षाचा अनुभव.
- पद क्रमांक 10 : समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी.
- पद क्रमांक 11 : विधी पदवी + 03 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 12 : वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्या शास्त्र, मानसशास्त्र अथवा समकक्ष पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 13 : 60% गुणांसह B.com ( मागासवर्गीय 55% गुण) MS-CIT + 03 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 14 : 10 वी उत्तीर्ण
- पद क्रमांक 15 : 10 वी उत्तीर्ण ITI ( सर्वेक्षक) + 02 वर्षाचा अनुभव
- पद क्रमांक 16 : 10 वी उत्तीर्ण , संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग चा दोन वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम + 07 वर्षाचा अनुभव.
♦️ वयाची अट (Age Limit)
- खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्ग/ अनाथ उमेदवार/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ खेळाडू : 18 ते 43 वर्ष.
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ पूरग्रस्त/ भूकंपग्रस्त/ दिव्यांग : 18 ते 45 वर्ष
- पदवीधर अंशकालीन उमेदवार : 18 ते 55 वर्षे
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- मुंबई, महाराष्ट्र
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाईन अर्ज सुरुवात : 18 फेब्रुवारी 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2026
- परीक्षा शुल्क भरण्याची तारीख : 20 मार्च 2026 पर्यंत
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- अर्जदार उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
- कौशल्य विकास चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
- गुणवत्ता यादी
- निवड सूची यादी
- अंतिम निवड
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
- ओळखपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे ( 10वी 12वी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र)
- जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- फोटो
- सही
- इतर आवश्यक कागदपत्रे
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्गासाठी ₹1000 अर्ज शुल्क आहे.
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 अर्ज शुल्क आहे.
- अनाथ उमेदवारांसाठी 900 अर्ज शुल्क आहे.
- माजी सैनिक/ दिव्यांग उमेदवार यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही
MMRDA Bharti 2026 Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत भेट द्यावे.
- नवीन नोंदणी करावी
- उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडून अर्जामध्ये काळजीपूर्वक माहिती भरावी.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
- माहिती अचूक भरल्याचे खात्री करून अर्ज सबमिट करावा.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अगोदर अर्ज करावा.
- मुंबई विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे ही चांगली संधी आहे.
- मोठ्या पगाराची नोकरी मिळणार आहे
MMRDA Bharti 2026 – Best FAQ
1) MMRDA Bharti 2026 काय आहे?
MMRDA Bharti 2026 ही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) मार्फत विविध पदांसाठी घेतली जाणारी सरकारी भरती प्रक्रिया आहे.
2) MMRDA Bharti 2026 मध्ये कोणती पदे आहेत ?
या भरतीमध्ये खालील पदांसाठी अर्ज मागवले जाऊ शकतात:
- Junior Engineer
- Assistant Engineer
- Clerk / Typist
- Technician
- Stenographer
- Manager / Deputy Manager
3) MMRDA Bharti साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार पात्रता वेगवेगळी असते. सामान्यतः खालील पात्रता आवश्यक असते:
- 10वी / 12वी पास
- Diploma (Engineering)
- Graduate / Engineering Degree
4) MMRDA Bharti साठी वयोमर्यादा किती आहे?
साधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.
5) MMRDA Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online अर्ज करावा.
6) MMRDA Bharti साठी अर्ज शुल्क किती आहे?
साधारणपणे अर्ज शुल्क ₹500 ते ₹1000 दरम्यान असू शकते.
आरक्षित प्रवर्गासाठी शुल्कात सूट दिली जाते.
7) MMRDA Bharti निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते:
- Written Exam
- Interview
- Document Verification
8) MMRDA Bharti मध्ये पगार किती असतो?
पदनुसार पगार वेगळा असतो. साधारणपणे ₹25,000 ते ₹1,50,000 प्रति महिना पगार मिळू शकतो.
9) MMRDA Bharti साठी नोकरीचे ठिकाण कुठे असते?
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरात पोस्टिंग मिळते.